• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सोनलची थेट तुलना केली सचिन तेंडुलकरशी! बीसीसीआय अधिकाऱ्याच्या पोस्टने वादाला फोडणी

August 27, 2026 by admin Leave a Comment


भारत श्रीलंका कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशीचा खेळ पाहता हा सामना आता ड्रॉच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.. कारण श्रीलंकेचा युवा फलंदाज सोनल दिनुशा याने शेवटच्या दिवशीही टीम इंडियाला चांगलंच झुंजवलं. इतकंच काय तर भारताविरुद्ध चारही डावात अर्धशतकी खेळी करून त्याने इतिहास रचला आहे. या कामगिरीसह त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. असं असताना बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सोनलची तुलना थेट सचिन तेंडुलकरसोबत केली. राजीव शुक्ल यांनी कोलंबो कसोटी सुरू असताना केलेल्या पोस्टमुळे आता वादाला फोडणी मिळाली आहे. भारत श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रादरम्यान त्यांनी ट्वीट केलं आणि वाद सुरू झाला. क्रीडाप्रेमी आणि नेटकऱ्यांना थेट सचिनशी केलेली तुलना काही भावली नाही.

सचिनसारखाच सोनल!

राजीव शुक्ला यांनी गुरूवारी कोलंबो कसोटी दरम्याने सोनलवर स्तुतीसुमनं उधळली होती. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, ‘श्रीलंकेचा सोनल एक जबरदस्त खेळाडू आहे. तो सचिनसारखा वाटतो. तो एक चांगला कसोटी खेळाडू होऊ शकतो.’ सोनल दिनुशाची तुलना थेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी केल्याने चाहत्यांना राग अनावर झाला आहे. त्यांनी राजीव शुक्ला यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.

This Sonal of Srilanka is an amazing player. Looking like Tendulkar. Can be a wonderful test player in international cricket. @OfficialSLC

— Rajeev Shukla (@ShuklaRajiv) August 27, 2026

How can you compare with Sachin Tendulkar with 2 test matches innings? Are you dumb ? Do you have some cricket knowledge ?

— PUSHPENDRA CHAUDHARY (@Da_Pushpendra) August 27, 2026

सोनल दिनुशा याने भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेत आपल्या कामगिरीने छाप सोडली आहे. गॉलमध्ये कोसटी शतक ठोकलं होतं. कोलंबोतही त्याची बॅट चांगलीच तळपली. त्याने चारही डावात 50हून अधिक धावा करण्याचा विक्रम रचला. 67 वर्षानंतर भारताविरुद्ध अशी कामगिरी पाहायला मिळत आहे. यापूर्वी चारही डावात 1959 साली इंग्लंडच्या केन बॅरिंग्टनने अर्धशतक ठोकलं होतं. तर महेला जयवर्धनेच्या नावावरही हा विक्रम आहे. त्याने 2001 आणि 2005 मध्ये झालेल्या मालिकेत असा विक्रम केला होता. तर तीन फलंदाजांच्या नावार सलग 6 वेळा 50हून अधिक धावा करण्याचा विक्रम आहे. यात वेस्ट इंडिजचा शिवनारायण चंद्रपॉल, झिम्बाब्वेचा अँडी फ्लॉवर आणि ऑस्ट्रेलियाचा ख्रिस रॉजर्स यांच्या नावावर हा विक्रम आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तिबेटमध्ये ईशा फाउंडेशनचे ८० भक्त बेपत्ता… सद्गुरूंनी चीनकडे मोठी मागणी, व्हिडिओमध्ये भावूक झाले
  • Plane Crash : बारामतीनंतर आणखी एका ठिकाणी विमान कोसळलं; क्षणार्धात झाले अनेक तुकडे, दोघांचा मृत्यू
  • Nitesh Karale : राष्ट्रवादीचे नितेश कराळे मास्तर पोलिसांच्या ताब्यात; सोशल मीडियावरील एक चूक पडली महागात, राजकीय वर्तुळात खळबळ
  • Nepal Flood : जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक VIDEO
  • Dev Chaudhary: बॅट धरता येईना, कॅचही घेता येईना, ऑक्शनमध्ये नावंही नाही अन् थेट DPL मध्ये खेळला, विराट कोहलीच्या कोचशी थेट संबंध

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in