
Khawdya Dongar Case: छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावरुन चांदगुडे कुटुंबाने उडी मारुन आपलं आयुष्य संवपलं. या घटनेने महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. या घटनेनंतर अनेक गोष्टी रोज समोर येत आहे. सुरुवातीला आयफोनच्या हट्टापायी कुणालने उड्डी मारली असं समोर आले होते, पण आता असं समजत आहे की चांदगुडे कुटुंबात अनेक वाद होते. या वादामुळेच कुणाल तणावात होता आणि त्याने हे पाऊल उचलले. आता कुणालच्या बहिणीने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रक्षाबंधन जवळ आलंय… पण यंदा माझा भाऊ कुणालच माझ्यासोबत नाही. ही वेदना शब्दांत सांगण अत्यंत कठीण आहे, अशा अत्यंत भावुक शब्दांत कुणालच्या मावस बहिणीने तिची वेदना मांडली. खवड्या डोंगर घटनेनंतर सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये कुणाल, मावसी संगीता आणि मुरली काका यांच्याबद्दल अनेक खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे. आता यावर तिने आपला संतापही व्यक्त केला. कुणालच्या बहिणीने स्पष्ट केले की, कुणालने पैशांसाठी किंवा आयफोनसाठी हे पाऊल उचलले हे साफ खोटे आहे.. त्याच्याकडे आयफोन 15 प्रो होता आणि आई-वडिलांनी त्याला लहानपणापासून कसलीही कमी भासू दिली नव्हती. मावस बहिण म्हणाली की, “त्याला फक्त त्याचे वडिल हवे होते”
बहीण म्हणाली की, त्याला कोणतीही संपत्ती नको होती, त्याला फक्त त्याचे वडील हवे होते. गेल्या 20 वर्षांत ज्या आत्याने कधीच विचारपूस केली नव्हती, ती आत्या अचानक जवळ आल्याने ती आता मुरली काकांना कुटुंबापासून दूर नेणार अशी भीती कुणालला आणि मावशीला होती. मुरली काकांचा स्वभाव अत्यंत निर्मळ असल्याने त्यांच्याशी कोणीही गोड बोलले की ते लगेचच भाळायचे. याच गोष्टीचा फायदा उठवून वडिलांना आपल्यापासून दूर नेतील अशी भीती कुणालला सारखी सतवायची. आम्ही आमचा भाऊ, मावशी आणि काका यांना एकाचवेळी गमावले आहे, हे दुःख असह्य आहे. अशा वेळी ज्या गोष्टी त्यांनी कधी केल्याच नाहीत, त्या गोष्टींचा संबंध जोडून मृत व्यक्तींची बदनामी करू नका, असे आवाहन कुटुंबाने केले आहे.
Leave a Reply