• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

माझ्या नावाने ती अफवा पसरवली जातेय; अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं तातडीचं स्टेटमन; काय आहे प्रकरण?

July 28, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावाने सोशल मीडियावर आरक्षणासंदर्भात एक वादग्रस्त आणि बनावट विधान व्हायरल झाल्यानंतर तिने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे विधान पूर्णपणे खोटे, निराधार आणि बनावट असल्याचे स्पष्ट करत तिने अशा दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवू नये असे आवाहन चाहत्यांना आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना केले आहे.

अलीकडे सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीने जातीय आरक्षणाबाबत मत व्यक्त केल्याचा दावा करणारी एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये ती आरक्षण व्यवस्था रद्द करण्याच्या बाजूने असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, शिल्पाने या दाव्याचा ठाम शब्दांत इन्कार केला असून अशा कोणत्याही विधानाशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर तिने प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘माझ्या नावाने आरक्षणासंदर्भात खोटी विधाने जोडली जात आहेत. हे पाहून मला धक्का बसला आहे. हा पूर्णपणे बनावट आणि द्वेषपूर्ण खोटा प्रचार आहे. कृपया अशा फेक पोस्ट आणि अफवांवर विश्वास ठेवू नका.’ या स्पष्टीकरणाद्वारे तिने व्हायरल होत असलेले विधान आपले नसल्याचे स्पष्ट केले.

इंस्टाग्रामवरील पोस्टमुळे निर्माण झाला वाद

माहितीनुसार, इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये शिल्पा शेट्टीने जातीय आरक्षणाविरोधात वक्तव्य केल्याचा दावा करण्यात आला होता. त्या बनावट पोस्टमध्ये असा मजकूर होता की, ‘सर्वसाधारण प्रवर्गातील डॉक्टरांनी केवळ सर्वसाधारण प्रवर्गातील रुग्णांवर उपचार करावेत तर इतर समाजातील डॉक्टरांनी आपल्या समाजातील रुग्णांवरच उपचार करावेत. अशी व्यवस्था लागू झाली तर लोक स्वतःच आरक्षण रद्द करण्याची मागणी करतील. कारण गुणवत्ता आरक्षणातून मिळू शकत नाही’.

हा मजकूर शिल्पा शेट्टीच्या नावाने पसरवण्यात आला होता. मात्र, तिने याचा स्पष्ट शब्दांत इन्कार करत हा मजकूर पूर्णपणे बनावट असल्याचे सांगितले. सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आरक्षणाच्या विषयाशी संबंधित असल्याने ही पोस्ट वेगाने व्हायरल झाली आणि अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या.

फेक न्यूजच्या वाढत्या समस्येकडे लक्ष

शिल्पा शेट्टीच्या तात्काळ खुलाशामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या नावाने खोटी विधाने पसरवण्याचा प्रकार किती गंभीर बनला आहे, हे समोर आले आहे. सोशल मीडियावर कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता तपासणे आवश्यक असल्याचा संदेशही या घटनेतून अधोरेखित झाला आहे.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शुटिंग दरम्यान न्यूड फुटेज कॅमेऱ्यात कैद, मानसिक तणावात अभिनेत्री, 21 व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल
  • Kisses on Car : गर्लफ्रेंडला कारवर 4 तासात 3400 वेळा किस करायला लावणं आदित्यला चांगलचं महाग पडलं, जे वाटलं नव्हतं ते घडलं
  • IND vs SL: फक्त फिल्डींगसाठी आला अन् चमत्कार करुन गेला, सर्फराज खान असं काही बोलला की श्रीलंकन बॅटर…Video Viral
  • यालाच म्हणतात मित्र, रशियाने भारताला दिले मोठे वचन, पुतिन यांचे थेट आश्वासन..
  • रोमँटिक सीनमध्ये त्याचा ताबा सुटला, नको तिथे चुकीचा स्पर्श केला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in