• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महेश मांजरेकर यांच्या पत्नी मेधा कॅन्सरवर अखेर म्हणाल्या, ‘स्वतःच टेस्ट करुन घरी आली अन्…’, कसा होता ‘तो’ दिवस?

July 19, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट करत कॅन्सर झाल्याचं चाहत्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांच्या असंख्य चाहत्यांनी चिंता व्यक्त केलं. मेधा यांनी कोणालाच काहीच कल्पना नसताना कॅन्सरची पोस्ट केल्याने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मेधा यांनी कॅन्सरवरील उपचार, टेस्ट यांबद्दल खुलासा केला आहे. शिवाय माझ्या आईला देखील कॅन्सर झालेला, महेशला कॅन्सर झालेला आणि ते बरे देखील. मी देखील बरी होणार… असं देखील मेधा मुलाखतीत म्हणाल्या.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टबद्दल मेधा मांजरेकर म्हणाल्या, ‘ती पोस्ट खरं तर मी लोकांचे आभार मानण्यासाठी केलेली. गेल्या आठ महिन्यांपासून माझा प्रवास सुरु आहे. माझ्या घरात आईला कॅन्सर झालेलं मी पाहिलं आहे. महेशला देखील कॅन्सर झालेला आणि ते बरे देखील झाले. कॅन्सर झालेली मी पहिलीच नाही. अनेकांना कॅन्सर झाला आहे.’

‘जेव्हा मला कळलं की कॅन्सर झाला आहे, तेव्हा मला खरंच भीती वाटली नाही. कारण आता सायन्स पुढे गेलं आहे. चांगले उपचार आहे. किमोथेरपी देखील बऱ्यापैकी सोपी झाली आहे. थेरपी दरम्यान त्रास होतोच पण तुलनेने गोष्टी आता सहज सोप्या झाल्या आहेत.’

कॅन्सरचं निदान कधी झालं?

यावर मेधा यांनी मोठा किस्सा सांगितला. ‘मी एक ट्रिप प्लॅन केलेली. मला असं वाटलं की टेस्ट करायच्याच आहेत, तर आधी फिरुन येते. त्यानंतर टेस्ट करायला जाईल. त्यामुळे मी म्हटलं 10 दिवसांनीच टेस्ट करेल, त्यामुळे मी ट्रिपला गेले आणि फिरुन आल्यानंतर टेस्ट पूर्ण केल्या. त्यानंतर हा प्रवास सुरु झाला.’

‘ही टेस्ट मी स्वतःच जाऊन करुन आली, तेव्हा कळलं आणखी टेस्ट कराव्या लागतील. त्यानंतर घरी आल्यावर मी महेशला माझ्या कॅन्सरबद्दल सांगितलं. महेश खूप पॉझिटिव्ह आहे. त्याच्या कॅन्सरच्यावेळी देखील तो असाच पॉझिटिव्ह होता… माझी आई देखील बरी झाली आहे आणि मी देखील बरी होईल…’

‘माझा कॅन्सर जेनेटिक आहे. कारण आईला कॅन्सर झालेला. त्याला आता कोण काय करणार. काही गोष्टी स्वीकारणं आणि पुढे जाणं… त्यातून कसं बाहेर येता येईल हे पाहणं… जे हातात आहे ते करायचं आणि जे नाही ते स्वीकारायचं… कॅन्सर म्हटलं की आपण घाबरुन जातो. पण मी सगळ्यांना एकच सांगेल की, घाबरु नका… कारण आता चांगले उपचार आहेत. लढा तर द्यावाच लागणार कारण कॅन्सरपेक्षा उपचार अधिक वेदनादायी आहे… पण ठरवलं की सगळं होतं….’ असं देखील मेधा म्हणाल्या.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इथं चिमुकले होरपळले अन् ते पाणीपुरी… तो व्हिडिओ दाखवत सुषमा अंधारे यांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जळजळीत टीका
  • जमिनीची कटकट संपली, आता तलावांवर तरंगणार सोलर पॅनेल; सूर्यास्तानंतरही मिळणार अखंड वीज पुरवठा
  • 1 लाख रुपयांचे कॅन्सरचे इंजेक्शन निघाले चक्क पाणी! काळ्या बाजाराचा धक्कादायक पर्दाफाश
  • Actor Life : त्यांना माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते, मुली तर…, पॉर्नस्टार झालेल्या अभिनेत्याला पश्चाताप
  • तणावविरहीत आयुष्यासाठी जपानी टेकनीक, या 4 गोष्टी फॉलो केल्यास सगळं टेन्शन पळूनच जाईल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in