• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महेश मांजरेकर यांची पत्नी मेधा मांजरेकरांना कॅन्सर; पोस्ट लिहित म्हणाल्या, ‘काही प्रवास आयुष्य बदलून टाकतात..’

July 13, 2026 by admin Leave a Comment


महेश मांजरेकर यांची पत्नी मेधा मांजरेकर यांना कर्करोगाचं निदान झालं आहे. सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहित त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. मेधा मांजरेकर या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांना कॅन्सरचं निदान झाल्याचं कळताच इंडस्ट्रीतील कलाकारांनी आणि चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.

महेश मांजरेकर यांची पत्नी मेधा मांजरेकर यांना कर्करोगाचं निदान झालं आहे. सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहित त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. मेधा मांजरेकर या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांना कॅन्सरचं निदान झाल्याचं कळताच इंडस्ट्रीतील कलाकारांनी आणि चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.

इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत मेधा मांजरेकर यांनी कॅन्सरवरील उपचारांचा एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पार केल्याचं सांगितलं आहे. त्यात त्यांनी लिहिलंय 'काही प्रवास असे असतात जे तुमचं आयुष्य कायमचं बदलून टाकतात. माझा हा प्रवास त्यापैकीच एक होता. पहिल्या टप्प्यातील उपचार संपत येत असताना आणि माझा वाढदिवसही जवळ येताना मी माझ्या मागच्या प्रवासाकडे वळून बघतेय.'

इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत मेधा मांजरेकर यांनी कॅन्सरवरील उपचारांचा एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पार केल्याचं सांगितलं आहे. त्यात त्यांनी लिहिलंय, 'काही प्रवास असे असतात, जे तुमचं आयुष्य कायमचं बदलून टाकतात. माझा हा प्रवास त्यापैकीच एक होता. पहिल्या टप्प्यातील उपचार संपत येत असताना आणि माझा वाढदिवसही जवळ येताना मी माझ्या मागच्या प्रवासाकडे वळून बघतेय.'

'कॅन्सरच्या निदानानंतर झालेली शस्त्रक्रिया केमोथेरपी आणि रेडिएशन यापेक्षा अत्यंत कठीण काळात मला लोकांकडून मिळालेलं प्रेम पाठिंबा आणि आशीर्वाद याचीच जास्त आठवण येतेय. यापुढे मी एकही पाऊल टाकू शकणार नाही असं जेव्हा मला वाटलं त्यावेळी माझ्या मदतीला कुणीतरी धावून आलं. देवानेच माझा हात धरून मोठा आधार दिला. मी हा प्रवास एकटीने केला नाही' अशा शब्दांत त्या व्यक्त झाल्या.

'कॅन्सरच्या निदानानंतर झालेली शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशन यापेक्षा अत्यंत कठीण काळात मला लोकांकडून मिळालेलं प्रेम, पाठिंबा आणि आशीर्वाद याचीच जास्त आठवण येतेय. यापुढे मी एकही पाऊल टाकू शकणार नाही, असं जेव्हा मला वाटलं त्यावेळी माझ्या मदतीला कुणीतरी धावून आलं. देवानेच माझा हात धरून मोठा आधार दिला. मी हा प्रवास एकटीने केला नाही', अशा शब्दांत त्या व्यक्त झाल्या.

'प्रत्येक वेळी जेव्हा मला वाटायचं की मी एक पाऊलही पुढे टाकू शकणार नाही तेव्हा कोणीतरी माझ्या बाजूने चालायला यायचं. आता मागे वळून पाहताना मला कळतंय की तो योगायोग नव्हता. ती देवानेच केलेली मदत होती. या प्रवासात मला जाणवलं की देव नेहमीच आपल्यासमोर दिव्य स्वरुपात प्रकट होत नाही. तो माझ्या आयुष्यात माझे गुरू माझे डॉक्टर नर्स कुटुंब मित्र आणि अगदी अनोळखी असलेल्या पण नंतर आशीर्वाद बनलेल्या व्यक्तीच्या रुपात आला. मला माझ्या गुरुंनीच शिकवलंय की शरणागती म्हणजे पराभव नाही ती श्रद्धेची सर्वोच्च पातळी असते. त्यामुळे शरणापती पत्करल्यावर 'माझ्यासोबतच असं का?' हा प्रश्न मी विचारणं सोडून दिलं आणि प्रत्येक आव्हानामागे एक उद्देश असतो यावर विश्वास ठेवला' असं मेधा मांजरेकर यांनी लिहिलं.

'प्रत्येक वेळी जेव्हा मला वाटायचं की मी एक पाऊलही पुढे टाकू शकणार नाही, तेव्हा कोणीतरी माझ्या बाजूने चालायला यायचं. आता मागे वळून पाहताना मला कळतंय की, तो योगायोग नव्हता. ती देवानेच केलेली मदत होती. या प्रवासात मला जाणवलं की, देव नेहमीच आपल्यासमोर दिव्य स्वरुपात प्रकट होत नाही. तो माझ्या आयुष्यात माझे गुरू, माझे डॉक्टर, नर्स, कुटुंब, मित्र आणि अगदी अनोळखी असलेल्या पण नंतर आशीर्वाद बनलेल्या व्यक्तीच्या रुपात आला. मला माझ्या गुरुंनीच शिकवलंय की शरणागती म्हणजे पराभव नाही, ती श्रद्धेची सर्वोच्च पातळी असते. त्यामुळे शरणापती पत्करल्यावर 'माझ्यासोबतच असं का?' हा प्रश्न मी विचारणं सोडून दिलं आणि प्रत्येक आव्हानामागे एक उद्देश असतो, यावर विश्वास ठेवला,' असं मेधा मांजरेकर यांनी लिहिलं.

कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने या कठीण काळात दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी पुढे सांगितलं 'एक आई आयुष्यभर असाच विचार करते की ती नेहमीच तिच्या मुलांचा हात धरून राहील. पण या प्रवासाने मला याची जाणीव करून दिली की एक दिवस नकळत मुलं आपल्या आईचा हात धरू लागतात. माझा हात धरल्याबद्दल माझ्या मुलींचे आभार. कायम माझ्यासोबत राहिल्याबद्दल महेशलाही धन्यवाद. काही प्रवास एकट्याने करायचे नसतात. माझी बहीण चुलत बहिणी मित्र-मैत्रिणी.. या सर्वांनी प्रेमाचा अर्थच बदलून टाकला. ही लोकं फक्त माझ्या पाठिशी उभे राहिले नाहीत तर त्यांनी मला हसवलं माझ्यासोबत प्रार्थना केली घरी आले माझे सर्वांत कठीण दिवस मला कधीही एकट्याने सामोरं जावं लागणार नाही याची त्यांनी खात्री केली.'

कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने या कठीण काळात दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी पुढे सांगितलं, 'एक आई आयुष्यभर असाच विचार करते की ती नेहमीच तिच्या मुलांचा हात धरून राहील. पण या प्रवासाने मला याची जाणीव करून दिली की एक दिवस नकळत मुलं आपल्या आईचा हात धरू लागतात. माझा हात धरल्याबद्दल माझ्या मुलींचे आभार. कायम माझ्यासोबत राहिल्याबद्दल महेशलाही धन्यवाद. काही प्रवास एकट्याने करायचे नसतात. माझी बहीण, चुलत बहिणी, मित्र-मैत्रिणी.. या सर्वांनी प्रेमाचा अर्थच बदलून टाकला. ही लोकं फक्त माझ्या पाठिशी उभे राहिले नाहीत, तर त्यांनी मला हसवलं, माझ्यासोबत प्रार्थना केली, घरी आले, माझे सर्वांत कठीण दिवस मला कधीही एकट्याने सामोरं जावं लागणार नाही, याची त्यांनी खात्री केली.'

मेधा मांजरेकर यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांच्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे. प्राजक्ता गायकवाड केतकी माटेगांवकर सई मांजरेकर नीना कुळकर्णी नेहा पेंडसे दीप्ती लेले वरुण ईनामदार पूर्वा गोखले तेजस्विनी लोणारी मंजिरी ओक यांसारख्या कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मेधा मांजरेकर यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांच्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे. प्राजक्ता गायकवाड, केतकी माटेगांवकर, सई मांजरेकर, नीना कुळकर्णी, नेहा पेंडसे, दीप्ती लेले, वरुण ईनामदार, पूर्वा गोखले, तेजस्विनी लोणारी, मंजिरी ओक यांसारख्या कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग… सुषमा अंधारे संतापल्या
  • अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
  • Khawdya Dongar tragedy : खवड्या डोंगर प्रकरणात मोठी अपडेट… अखेर मावस बहिणीने सर्वच सांगितलं, थेट म्हणाली..
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, थेट अपर सचिवांना अटक; धक्कादायक खुलासे होणार?
  • Nepal Flood: नेपाळमध्ये पूराचा हाहाकार, गावची गावं वाहून गेली, पत्त्यांप्रमाणे कोसळल्या इमारती, धडकी भरवणारे व्हिडीओ समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in