• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महाराष्ट्रात पावसाचा कहर, अतिवृष्टीचा मोठा इशारा, पुढील 24 तास धोक्याची, जिल्ह्याधिकाऱ्यांचे मोठे आदेश..

July 31, 2026 by admin Leave a Comment


राज्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आज काही जिल्ह्यांमध्ये थेट अतिवृष्टीचा इशारा दिला. अतिवृष्टीच्या इशाऱ्यात शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्यात. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सर्वदूर सुरू आहे. त्यातच आज मोठा इशारा देण्यात आला. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे आणि नाशिक घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. जैसलमेरपासून रायसेनपर्यंत वादळी वाऱ्याची प्रणाली सक्रिय झाली. ठाणे, रायगड, धुळे, नाशिक, सातारा, जळगाव येथे भारतीय हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. अहिल्यानगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला. यवतमाळ जिल्ह्यात पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर केली.

नंदुरबार जिल्ह्यात सलग तीन दिवसांच्या रिमझिम पावसानंतर अखेर पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. रात्रभरापासून नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू असून, शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर आणि जुलै महिन्याच्या अखेरच्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. वाशिम जिल्ह्यात रात्रभर जोरदार पाऊस झाला. सहाही तालुक्यांत मुसळधार पावसाची संततधार.

वाशिम, कारंजा, रिसोड, मंगरूळपीर, मालेगाव आणि मानोरा पावसाने झोडपले. आज सकाळपर्यंतही पाऊस कायम शेतकऱ्यांना मोठा दिलासा. जिल्ह्यात भूजल पातळीत वाढ मात्र अद्याप नदी-नाल्यांना पूर नाही. पुढील 24 तास मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. जिल्ह्यात काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता. नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे.

मुसळधार पावसामुळे नांदगाव खंडेश्वर शहरातील दुकानासह नागरिकांच्या घरात पाणी शिरले. अमरावती शहरासह परिसरात हवामान विभागाच्या वतीने अतिवृष्टीचा इशारा दिला. कालपासून अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. धामक गावाचा संपर्क तुटला गावाला चारही बाजूने पाण्याने वेडल्याने गावाला बेटाचे स्वरूप. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धमक गावाचा संपर्क तुटला. यवतमाळमध्ये पावसाचा जिल्ह्याला रेड अलर्ट असल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली, जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रॉयल एनफील्डचा धमाका! आयकॉनिक Continental GT 650 नवीन फीचर्ससह लाँच; जाणून घ्या किंमत
  • पाय बांधले, डोक्यावर वार.. NEET विद्यार्थिनीच्या हत्येने शहर हादरलं; पोस्टमॉर्टम रिपोर्टने उडवली खळबळ
  • आता इराणला हरवणे अशक्य ? अमेरिकेशी युद्ध सुरु असताना इराणला गवसला मोठा खजाना…
  • मोठा दणका! मुंबईत मंत्र्यांच्या फ्लॅटवर थेट कारवाई, उच्चभ्रू टॉवरमधील 128 फ्लॅटवर हतोडा?
  • भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीत फडणवीसांची एंट्री? दिल्ली वाऱ्या वाढल्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in