• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महागड्या आयफोनचं डोक्यात खुळ, नातवाने आजोबांच्या घरात 6 लाखांच्या सोन्यांच्या दागिन्यांवर मारला डल्ला

September 3, 2026 by admin Leave a Comment


भारतात आयफोन फोनची क्रेझ वाढली आहे. लहानांपासून ज्येष्ठा नागरिक हे आयफोनचे चाहते आहेत. अनेक जण कर्ज काढून आयफोनची खरेदी करत आहेत. लहान मुलेही या आयफोनसाठी आई-वडिलांकडे हट्ट करत आहेत. याच आयफोनसाठी एका अल्पवयीन मुलाने चक्क चोरी केल्याचे उघडीस आलं आहे. ही चोरी त्याने स्वत:च्या आजोबाच्या घरातच केल्याचे उघड झालं आहे. त्याने घरातील लाखो रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. अल्पवयीन मुलाच्या कृत्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळच्या कनकवाडी परिसरात हा प्रकार घडला आहे. खिशात पैसे नाही पण आयफोन घ्यायचा आहे, अशा परिस्थितीत अल्पवयीन मुलाने आजोबाच्या घरी चोरी करून सहा लाख 72 हजार रुपयांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी डीबी पथकाने नातवासह एका तरुणाला ताब्यात घेऊन चोरीतील मुद्देमाल जप्त केला आहे. चोरट्याने घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून 52 ग्रॅमचे सहा लाख 72 हजाराचे दागिने लंपास केले आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अल्पवयीन मुलासह गुणवंत उर्फ पोलार्ड पांडुरंग दानव (वय 23 वर्ष – विठ्ठलवाडी) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यातील अल्पवयीन मुलाला आयफोन घ्यायचा होता. त्याने ही बाब मित्र गुणवंत दानव, सुरज गेडाम (25 वर्ष) यांना सांगितली. त्यानंतर दोघांनी अल्पवयीन मुलाला चोरी करण्यास प्रोत्साहन दिले. चोरी केल्यानंतर दागिने विकण्यासाठी नागपूर किंवा चंद्रपूरकडे जाण्याच्या तयारीत असताना डीबी पथकाने दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणातील आरोपी सुरत गेडाम हा पसार आहे.

नेमकं काय घडलं?

यवतमाळच्या कनकवाडी परिसरात राहणाऱ्या बंडू बोढाले यांच्या घरी 20 ते 21 ऑगस्टच्या मध्यरात्री घरफोडी झाली. त्यांच्या कपाटातून सोन्याचे दागिने चोरीला गेले. त्यानंतर त्यांनी 1 सप्टेंबर रोजी वणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाला सुरुवात केली होती. त्यावेळी पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे संविधान चौकातून गुणवंत उर्फ पोलार्ड दानवला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केल्यानंतर धक्कादायक कारण समोर आलं.  अल्पवयीन मुलाला आयफोन प्रो खरेदी करायचा होता. त्यासाठी त्याच्याकडे आवश्यक पैसे नव्हते. त्याने मित्राकडे आयफोन खरेदी करण्याची इच्छा सांगितली. परंतु त्याच्या मित्रांनी चुकीचा सल्ला दिला. त्याचे मित्र गुणवंत दानव, सुरज गेडामने (23 वय) त्याला चोरी करायचा सल्ला दिला. दोघांनी चोरी करण्यास प्रवृत्त केल्याने अल्पवयीन मुलाने आजोबाच्या घरातच चोरी केली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • DJ Ban : 1 नोव्हेंबरपर्यंत डीजे बंदी, विश्वास नांगरे पाटलांचा सर्वात मोठा निर्णय!
  • विद्यानंद बापटांवर हल्ला का केला? हल्लेखोराने सांगितलं कारण, VIDEO
  • प्रचंड बोल्ड सीनमुळे भारतात या चित्रपटावर घातली बंदी, पण OTT वर येताच पाहण्यासाठी उडाली झुंबड
  • European T20 Premier League स्पर्धेत पहिल्या हॅटट्रीकची नोंद, टॉम करनने रचला इतिहास
  • एक्सपायरी डेट म्हणजे निव्वळ शाई नव्हे, तो तर विश्वासघात! तुकाराम मुंढे यांचा संताप, भेसळखोरांविरोधात सर्जिकल स्ट्राईक होणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in