• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एक्सपायरी डेट म्हणजे निव्वळ शाई नव्हे, तो तर विश्वासघात! तुकाराम मुंढे यांचा संताप, भेसळखोरांविरोधात सर्जिकल स्ट्राईक होणार?

September 3, 2026 by admin Leave a Comment


अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईने भेसळखोरांचे धाबे दणाणले आहे. हॉटेलचालक, धाबेचालकांपासून मिठाई विक्रेते, दूध विक्रेतेच नाही तर बड्या कंपन्यांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दणका दिला आहे. राज्यात धडाधड कारवाई होत असल्याने अनेक विक्रेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मुंढे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नागरिकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यांची या विभागातून लवकर बदली न करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान एक्सवर एक पोस्ट करत तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या पुढील कारवाईचे संकेत दिले आहेत.

तो तर विश्वासघात

धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टमधून त्यांनी मोठा संदेश दिला आहे. जेव्हा एखाद्या पाकिटावरचं लेबल खोटं बोलतं तरीही ग्राहकाला त्याची किंमत मोजावी लागते. एक्सपायरी डेट ही निव्वळ पॅकिंगवरील शाई नाही. पदार्थांच्या घटकांची पाकिटावरची माहिती ही ग्राहकाला दिलेलं वचन आहे. जेव्हा हे वचन तोडल्या जातं, जाणूनबुजून ते बदलले जाते. तेव्हा तो नियमाचा भंग ठरत नाही. तो ग्राहकांसोबतचा विश्वासघात असतो, असे मुंढे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

When a label lies, the consumer pays the price.

An expiry date is not just ink on a package.A nutrition label is not just information.They are promises made to the consumer.

When those promises are deliberately manipulated, it is not merely a violation of regulations, it is a…

— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) September 2, 2026

आम्हाला दहशत पसरवायची नाही, पण…

आम्हाला कुठल्याही व्यवसायात भीती अथवा दहशत पसरवायची आहे म्हणून आम्ही नियमावली तयार करत नाही. अन्न पदार्थ आणि औषधं विकली जातात ती योग्य आहेत की नाही? त्यातील घटक पदार्थ बरोबर आहेत की नाही. जी वचनं दिली आहेत, ती प्रामाणिकपणे पाळली गेली आहेत की नाही? या सगळ्यांसाठी ही नियमावली तयार करण्यात आली आहे. ग्राहक आणि व्यापारी यांच्यातील पोषक आणि पारदर्शक वातावरण निर्माण करण्यासाठी असते, असा सज्जड इशारा तुकाराम मुंढे यांनी या पोस्टमधून दिला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ कराल तर कारवाई करण्यात येईल असे सूतोवाच या पोस्टमधून मुंडे यांनी केले आहे. दरम्यान एफडीएची राज्यातील अनेक ठिकाणी कारवाई सुरूच आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Abhijit Deepke : अभिजीत दीपकेंना सर्वात मोठा झटका, त्या मोहिमेला मोठा फटका; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश काय?
  • Jalna | जरांगेंच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद! वडीगोद्रीचं पार्किंग फुल्ल; हजारो आंदोलक पायी अंतरवालीकडे रवाना
  • किमान सभ्यता तरी हवी.. ‘रंभा हो..’ फेम अभिनेत्रीची नाराजी; 70 व्या वर्षी काम मागितल्यावर मिळतेय अशी वागणूक
  • Suyog Rajnekar | गरिबांच्या लेकरांचा घास चोरला जातोय! MPSC पेपरफुटीवर तरुणाची हृदयस्पर्शी कविता व्हायरल; रोहित पवारांनीही केली शेअर
  • 1994पासून आजपर्यंत काय करताय? मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांचं स्पष्ट मत, एका विधानानेच…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in