• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रचंड बोल्ड सीनमुळे भारतात या चित्रपटावर घातली बंदी, पण OTT वर येताच पाहण्यासाठी उडाली झुंबड

September 3, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडतात. या चित्रपटांमधील काही सीन असो किंवा डायलॉग यामुळे या चित्रपटांना काही संघटना विरोध करतात आणि यामुळेच हे चित्रपट प्रदर्शित होत नाही. असेच काही चित्रपट जे बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शित झाले नाहीत. मात्र, हे चित्रपट सध्या ओटीटीवर उपल्बध आहेत. ओटीटीवर या चित्रपटांना पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी देखील करत आहेत. या यादीतील चर्चेत राहिलेला पहिला चित्रपट म्हणजे ‘अनफ्रीडम’.

2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला भारतात थिएटर रिलीजची परवानगी मिळाली नव्हती. दिग्दर्शक राज अमित कुमार यांच्या या चित्रपटात दहशतवाद, धार्मिक कट्टरता, समलैंगिक संबंध, प्रेम आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांसारख्या संवेदनशील विषयांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.

चित्रपटाची कथा काय?

‘अनफ्रीडम’ची कथा वेगवेगळ्या पात्रांच्या आयुष्याभोवती फिरते. एका बाजूला दहशतवाद आणि धार्मिक कट्टरतेचा मुद्दा मांडण्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूला स्वतःची ओळख, प्रेम आणि आपल्या इच्छेनुसार जगण्याचा अधिकार यासाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तींची कहाणी दाखवण्यात आली आहे.

सेन्सॉर बोर्डाच्या आक्षेपामुळे अडचणी

‘अनफ्रीडम’ भारतात प्रदर्शित करण्यासाठी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडे (CBFC) सादर करण्यात आला होता. मात्र, चित्रपटातील काही सीन आणि संवेदनशील विषयांवर बोर्डाने आक्षेप घेत अनेक बदल सुचवले.

विशेषतः समलैंगिक संबंध आणि इंटिमेट सीन, तसेच दहशतवाद आणि धार्मिक कट्टरतेशी संबंधित आशयामुळे चित्रपट चर्चेत आला. निर्मात्यांनी सुचवलेले बदल करण्यास नकार दिला. त्यांच्या मते, मोठ्या प्रमाणावर सीन किंवा आशय बदलल्यास चित्रपटाची मूळ संकल्पना आणि त्याचा प्रभाव कमी होऊ शकतो.

यानंतर चित्रपटाच्या टीमने सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाविरोधात अपील केले. मात्र, त्यानंतरही ‘अनफ्रीडम’ला भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याची परवानगी मिळाली नाही.

परदेशात झाले स्क्रीनिंग

भारतामध्ये रिलीज रखडली असली तरी ‘अनफ्रीडम’चे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्क्रीनिंग करण्यात आले. संवेदनशील विषय हाताळण्याच्या पद्धतीमुळे या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये चर्चा झाली.

आजही ‘अनफ्रीडम’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सेन्सॉरशिप, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संवेदनशील विषयांच्या मांडणीवर चर्चा घडवून आणणाऱ्या चित्रपटांपैकी एक म्हणून पाहिला जातो.हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे, पण मात्र प्रादेशिक निर्बंधांमुळे तो ठराविक देशांमध्येच पाहता येतो.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Abhijit Deepke : अभिजीत दीपकेंना सर्वात मोठा झटका, त्या मोहिमेला मोठा फटका; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश काय?
  • Jalna | जरांगेंच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद! वडीगोद्रीचं पार्किंग फुल्ल; हजारो आंदोलक पायी अंतरवालीकडे रवाना
  • किमान सभ्यता तरी हवी.. ‘रंभा हो..’ फेम अभिनेत्रीची नाराजी; 70 व्या वर्षी काम मागितल्यावर मिळतेय अशी वागणूक
  • Suyog Rajnekar | गरिबांच्या लेकरांचा घास चोरला जातोय! MPSC पेपरफुटीवर तरुणाची हृदयस्पर्शी कविता व्हायरल; रोहित पवारांनीही केली शेअर
  • 1994पासून आजपर्यंत काय करताय? मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांचं स्पष्ट मत, एका विधानानेच…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in