
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या वर्धापन दिन सोहळ्यादरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीएमसीच्या या कार्यक्रमादरम्यान रस्त्यांची पूर्णपणे नाकेबंदी करणे, पोलिसांसोबत झटापट करणे आणि कार्यक्रमासाठी ठरवून दिलेल्या वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करणे असे आरोप ममता बॅनर्जी यांच्यावर आहेत. न्यायालयाच्या आदेशात कार्यक्रमांसाठी काही अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, या सोहळ्यात त्याचे पालन केले गेले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
Leave a Reply