
मनोज जरांगे यांचा गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेले उपोषण संपवण्यासाठी सरकारच्या वतीने आत जालनाचे पोलिस अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना सरकारने पाठवले होते. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी या अधिकाऱ्यांना का पाठवले असा सवाल करत जोपर्यंत राजकीय नेतृत्व येथे येऊन स्पष्ट आश्वासन देत नाही तोपर्यंत आपले उपोषण सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मनोज जरांगे यांचा उपोषणाचा चौथा दिवस आहे. गेल्या २९ ऑगस्ट पासून मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केले आहे. आज दुपारी सरकारच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे यांनी भेटायला येणार असल्याचे म्हटले जात होते. परंतू दुपारी सरकारच्या वतीने कोणताही मंत्री आला नाही. त्यानंतर रात्री उशीरा जरांगे यांच्या भेटीला जालनाचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक जरांगे यांच्या भेटाला आले. मात्र मनोज जरांगे यांनी अधिकाऱ्यांना माझ्याकडे का पाठवले तुम्हा नेत्यांना येता येत नाही का असा असा सवाल या शिष्ठमंडळाला केला.
हा अधिकाऱ्यांचा विषय नाही. अधिकाऱ्यांनी माझ्याकडे येऊ नये. सर्व मागण्या पूर्ण करून माझ्याकडे जीआर घेऊन या, असे या शिष्टमंडळाला जरांगेंनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. उद्या सकाळपर्यंत सर्व मागण्यांचा जीआर निघाला पाहिजे अशी मागणी जरांगे पाटील यांनी यावेळी केली.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply