• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारत झिम्बाब्वे तिसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये पुन्हा बदल, श्रेयस अय्यर टॉस जिंकल्यानंतर म्हणाला…

July 26, 2026 by admin Leave a Comment


भारताने झिम्बाब्वेविरुद्धची तीन सामन्यांची टी20 मालिका आधीच 2-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा सामना हा औपचारिक आहे. मात्र या सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया झिम्बाब्वेला क्लिन स्विप देण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली तर आयसीसी क्रमवारीत नक्कीच फायदा होणार आहे. भारताने पहिल्या सामन्यात 7 गडी राखून, तर दुसऱ्या टी20 सामन्यात 90 धावांनी विजय मिळवला होता. आता तिसऱ्या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. श्रेयस अय्यरने सलग आठ सामन्यान नाणेफेक जिंकली होती. पण दुसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावला होता. आता पुन्हा एकदा नाणेफेक जिंकत नवा प्रवास सुरू केला आहे.

काय म्हणाला श्रेयस अय्यर?

कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘कालच्यासारखीच खेळपट्टी असल्याने आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. खेळ जसजसा पुढे जाईल तसतशी खेळपट्टी संथ होईल अशी अपेक्षा आहे. आम्हाला लवकर जुळवून घेणे महत्त्वाचे असेल. आम्ही एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू. संघात दोन बदल, प्रिन्स बाहेर गेल्याने अशोक संघात आला आहे, शिवम दुबेच्या जागी सूर्यांशला संधी मिळाली आहे.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): ब्रायन बेनेट, बेन कुरान, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमनी (विकेटकीपर), ब्रॅड इव्हान्स, न्यूमन न्याम्हुरी, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुझाराबानी.

भारत (प्लेइंग इलेव्हन): वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, रवी बिश्नोई, अशोक शर्मा, यश ठाकूर, मयंक यादव.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पाकिस्तान महिला क्रिकेटची वेगवान गोलंदाज आयमन अन्वरची निवृत्ती, कारण की..
  • कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
  • मोहन भागवतांच्या अमेरिकेतील कार्यक्रमावरून वाद, 61 संघटनांचा विरोध, नेमकं कारण काय?
  • थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
  • राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in