• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारताच्या सीमेजवळ बांगलादेशची कुरापत, तुर्कीच्या ड्रोनने वाढले भारताचे टेन्शन….

August 2, 2026 by admin Leave a Comment


Bangladesh New Cantonment : बांग्लादेशात सत्तापालट झाल्यानंतर आता चीन आणि पाकिस्तानशी या देशाची जवळीक वाढल्याने भारताची चिंता वाढली आहे. त्यातच आता बांगलादेशी सैन्याने मान्यमारला असलेल्या सीमेनजिक एक नवी छावणी उभी करण्यास सुरुवात केली आहे. बांदरबन जिल्ह्याच्या नाईखोंगछारी भागात या घडामोडी सुरु आहेत. येथील शस्रसज्ज रोहिंग्या समुहाची उपस्थिती चिंताजनक बनली आहे. विश्वासार्ह सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बांगलादेशा येथे आपला तळ स्थापन करण्यासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या निवडलेल्या भूभागावर झेंडे गाडून सीमांकनाचे काम सुरु आहे. ही जमीन नव्या सैन्य तळासाठी आरक्षित केली जात आहे. नाईखोंगछारी कॉक्स बाजार जिल्ह्यातील रामू भागात हा तळ उभारला जात आहे. येथे बांगलादेशी सैन्याच्या दहावी इन्फॅंट्री डिविजनचे मुख्यालय आधीपासूनच कार्यरत आहे. बांदरबन जिल्ह्याचे शेवटचे गाव केओकराडोंग तीन देशांच्या ( बांगलादेश, मान्यमार आणि भारत ) मिलन बिंदूच्या खुपच जवळ आहे. त्यामुळे बांगलादेशाचे या पावलाने भारताचे टेन्शन वाढले आहे.

बांग्लादेशची छावणीचे भारताला का टेन्शन?

भारतीय सीमेवर मिझोरमचा डुडुक्सोरा भाग येतो, जेथे सीमा सुरक्षा बलाची तुकड्या तैनात आहे. याच प्रकारे तेकनाफच्या उत्तरेला सिल्खाली नावाचे छोटे किनारी गावात देखील हालचाली वाढल्या आहेत. जेथे जमीनीचे सपाटीकरण आणि इतर कामे वेगाने सुरु आहेत. सिल्खाली हे बंगालच्या खाडी किनारी वसलेले गाव आहे आणि ते तेकनाफपासून सुमारे ३० किमी दूर आहे. नॉर्थ ईस्ट न्यूजच्या मते गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये सैन्य प्रमुख जनरल वाकर-उज-जमान यांनी स्वत: या भागाचा दौरा केला होता. आणि सप्लाय बेससाठी उपयुक्त स्थानाची निवड केली होती. हा बेस सैन्य पुरवठ्यासाठी महत्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित होणार आहे.

प्रगत ड्रोन आणि हवाई संरक्षण प्रणाली

बांगलादेशाचे सैन्यदल येथे तोफखान्याच्या सरावासाठी आधीपासूनच एक फायरिंग रेंज चालवते. यामध्ये प्रामुख्याने तुर्की बनावटीच्या फील्ड गन, रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली, मोर्टार आणि अन्य शस्त्रास्रांचा समावेश आहे. बांगलादेश तुर्कीकडून प्रगत ड्रोन आणि हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे तुर्कीने दिलेली शस्त्रे या नव्या सैन्य छावणीसाठी तैनात केली जातील का अशी भीती आहे. नायखोंगछारी आणि सिलखालीसारख्या ठिकाणी बांगलादेशी लष्कराचा विस्तार करण्याची ही योजना सीमा सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण मानली जाते.

प्रादेशिक सुरक्षा असमतोल ढळणार

ज्या प्रदेशात रोहिंग्या लढवय्ये तळ धरुन आहेत, तेथेचे बांगलादेशी लष्कराच्या वाढलेल्या हालचालींमुळे प्रादेशिक सुरक्षा असमतोल ढळू शकतो. हे क्षेत्र तीन देशांच्या सीमेच्या जवळ असल्याने भारत या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जमीन मोजणीपासून ते पुरवठा तळांच्या स्थापनेपर्यंतची तयारी येथे केली जात असल्यामुळे भारताला सतर्क राहण्याचा इशारा मिळाला आहे.

 

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • VIDEO : 10 बाय 10 ची रुम, नोटांनी भरलेल्या 30 बॅगा, महिला भिकाऱ्याच्या घरात इतका पैसा मिळाला, आकडा ऐकून थक्क व्हाल
  • Govinda: गोविंदा-सुनीताचा आणखी एक मोठा निर्णय; वैवाहिक आयुष्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर
  • DMart च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, आता शॉपिंग करणाऱ्यांना मिळणार मोठा फायदा, या वस्तू होणार स्वस्त
  • मी आता जास्त काम करु शकत नाही, नितीन गडकरी यांचं मोठं विधान; नेमका अर्थ काय?
  • Vastu Shastra : कितीही कष्ट करा हातात पैसा टिकत नाही? मग तुमच्या घरात असू शकतात हे दोष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in