
काही वेळा अशा घटना घडतात ज्याची कल्पनाही तुम्ही केलेली नसते, अशीच एक घटना आता समोर आली आहे. विमान प्रवासामध्ये ही घटना घडल्यामुळे काही काळ प्रवाशांमध्ये चंगालाच गोंधळ उडाला. विमान हजारो फूट उंचावरून उड्डान करत असतानाच एका प्रवाशाने अचानक विमानात गोंधळ घालण्यात सुरुवात केली. हा प्रवासी एवढा अनियंत्रित झाला की, त्यामुळे विमानाचं इमरजन्सी लँडिंग करण्याची वेळ आली. ही घटना अमेरिकेमध्ये घडली आहे. हा प्रवासी एवढा अनियंत्रित झाला की हे विमान मधूनच वळून बाल्टीमोर विमानतळावर उतरवण्यात आलं. ही घटना गुरुवारी रात्री घडल्याची माहिती समोर येत आहे. हा प्रवासी एवढा अनियंत्रित झाला की, त्याला नियंत्रणात आणण्यासाठी प्लॅस्टिकच्या हातकडीने बांधण्यात आलं, तसेच त्याला त्यानंतर त्याच्याच सिटवर चिकटपट्टीने चिटकवून टाकण्यात आलं. या प्रकाराचे काही फोटो देखील समोर आले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना अमेरिकन एअरसाइन्सचं विमान फ्लाइट 618 मध्ये घडली आहे. हे विमान टेक्सासच्या डलास फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळावरून न्यू जर्सीच्या नेवार्क विमानतळाकडे निघाले होते. याच विमानात ही घटना घडली आहे. हा प्रवासी विमानाच्या फर्स्ट क्लासमधून प्रवास करत होता. मात्र तो अचानक आक्रमक झाला. विमानात गोंधळ घालू लागला. त्यांचा गोंधळ एवढा वाढला की विमान पुढे जाणं अशक्य होतं, त्यामुळे विमानाचं इमर्जंसी लँडिंग करावं लागलं, त्यानंतर हे विमान मध्येच बाल्टीमोर विमानतळावर उतरवण्यात आलं.
मात्र या काळात देखील या प्रवाशाचा गोंधळ सुरूच असल्यामुळे अखेर एअर होस्टेसने या प्रवाशाच्या हातात प्लॅस्टिकच्या बेड्या घातल्या, त्या प्रवाशाला फार त्रास होणार नाही, याची काळजी देखील एअर होस्टेसने घेतली. त्यानंतर त्या प्रवाशाला प्लॅस्टिकच्या चिकट टेपने सीटवरच चिटकवून टाकण्यात आलं. या प्रवाशाला हालचाल करायला थोडी देखील संधी दिली नाही, त्यानंतर या विमानाचं इमरजन्सी लँडिंग करण्यात आलं, या प्रवाशाला विमानातून उतरवून देण्यात आलं. या प्रकारामुळे मोठा गोंधळ उडाला होता.
Leave a Reply