• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भरत गोगावले यांच्या पालकमंत्रिपदाबद्दल राज्यातील बड्या नेत्याचे भाष्य..

August 2, 2026 by admin Leave a Comment


नुकताच अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मोठे विधान केले. अंबादास दानवे यांनी म्हटले की, गृहमंत्री अमित शाह हे जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जे जे वाटते त्या लोकांना सपोर्ट करतात हे लोकांना कळतं.
देवेंद्र फडणीस सुद्धा अमित शाहांना फुकट मदत नाहीत, हेही कळतं भाषणात काही दोन शब्द बोलले असतील गोड. एकंदरीत जे राजकीय चित्र दिसत एकमेकांचे आडवा आणि एकमेकांची जिरवा अशा पद्धतीने चालेल स्पष्टपणे दिसते.  शिवसेनाप्रमुखांच्या विचारासाठी गेलो म्हणणाऱ्या लोकांना आता शिवसेनाप्रमुखांचा फोटो लावायला भीती वाटते. आता त्यांचे नेते अमित शहा झाले आहेत. नरेंद्र मोदी सुद्धा नेते आहेत की नाही माहित नाही. परंतु अमित शाह त्यांचे नेते झाले आहेत.

सुनेत्रा पवार आणि अमित शाह यांच्या भेटीबद्दल बोलताना अंबादास दानवे यांनी म्हटले की, अशा चर्चेला काही अर्थ नसतो अशा चर्चा होत असतात, पण या चर्चेतून अमित शहा फार काही करतील असं मला वाटत नाही. सिस्टीम ठरलेली आहे, त्यांच्या पक्षाची त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी काम करते. त्यामुळे काही सापडणार नाही आणि काही भेटणार नाही.

भरत गोगावले यांच्याबद्दल बोलताना अंबादास दानवे यांनी म्हटले की, खर तर ते पालकमंत्री होण्यासाठी इतके आतुर आहेत. त्यांची जास्त संख्या असणारी सीट सुद्धा पालकमंत्री पदासाठी तटकरेंना सोडली.  ते इलेक्शन होऊनही दोन अडीच महिने झाले. मात्र, गोगावल्यांची इच्छा काही पूर्ण होत नाही. म्हणून अशा गोष्टी त्यांना बोलाव्या लागतील. राजीनामा देणे मात्र कोणता मंत्री काय राजीनामा देत नाही.

शिंदेंनी संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना यांना अभिजीत दिपके यांच्या भेटीवरून सुनावल्याच्या मुद्द्यात बोलताना अंबादास दानवे यांनी म्हटले की, हा पब्लिसिटीचा स्टंट आहे, अभिजीत दिपकेची चळवळ योग्य दिशेने चालू आहे, त्यात आपण राजकारणाची मिसळ करू नये असं मला वाटतं. अभिजीत किंवा जी तरुणाई आवाज उठवते ते राजकीय निराशातून उभे राहिलेले चळवळ आहे.

कोणत्याही राजकीय पक्षाने त्यात इंटरफेअर करू नये सपोर्ट देण्याची भूमिका ठेवली पाहिजे. संजय शिरसाट, बच्चू कडू अभिजीत दीपके यांना भेटले तर अभिजीत दिपके आंदोलनाला त्याचा सपोर्ट होता का? तरुणाईवर जो लॉटरीचा झाला त्याला त्यांचा विरोध आहे का? अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे ही त्यांची मागणी आहे का? धर्मेंद्र प्रधान यांनी नीटमध्ये घोटाळा केला या मागणीसाठी ते सुस्पष्ट आहेत का याचाही खुलासा केला पाहिजे. एकीकडे तुमचे मालक अमित शहांचे पाय दाबतात आणि तुम्ही अभिजीत दीपके यांच्या घरी जाता हे दुपट्टेपणा आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • VIDEO : 10 बाय 10 ची रुम, नोटांनी भरलेल्या 30 बॅगा, महिला भिकाऱ्याच्या घरात इतका पैसा मिळाला, आकडा ऐकून थक्क व्हाल
  • Govinda: गोविंदा-सुनीताचा आणखी एक मोठा निर्णय; वैवाहिक आयुष्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर
  • DMart च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, आता शॉपिंग करणाऱ्यांना मिळणार मोठा फायदा, या वस्तू होणार स्वस्त
  • मी आता जास्त काम करु शकत नाही, नितीन गडकरी यांचं मोठं विधान; नेमका अर्थ काय?
  • Vastu Shastra : कितीही कष्ट करा हातात पैसा टिकत नाही? मग तुमच्या घरात असू शकतात हे दोष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in