• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भयंकर! घरातून कामाला निघाला, पुन्हा परतलाच नाही; लिफ्टमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

July 16, 2026 by admin Leave a Comment


बेंगळुरूच्या जयनगरमध्ये भयंकर घटना घडली आहे. हॉटेलच्या लिफ्टमध्ये अकडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तरुणाच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. तरुणाचा मृत्यू नेमका कसा झाला, याचं कारण पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासून शोधत आहे. परंतु 22 वर्षीय तरुणाच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

लिफ्टमध्ये शिरला अन्…

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणासोबत ही घटना गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. ‘दक्षिण उपहारा’ असे या हॉटेलचे नाव आहे. तर राजेश असे मृत तरुणाचे नाव आहे. तो धारवाड भागात राहायला होता. तो या हॉटेलमध्ये काम करत होता. प्राथमिक माहितीनुसार, राजेश हा गुरुवारी सकाळी हॉटेलमध्ये नवीन साहित्य आणत होता. त्यावेळी ही दुर्घटना घडली.

हॉटेलमध्ये दुर्घटना कशी घडली?

राजेश हॉटेलमध्ये वस्तू नेण्यासाठी कार्गो लिफ्टचा वापर करत होता. तो लिफ्टने दुसऱ्या मजल्यावर पोहोचत होता. त्याचवेळी त्याने डोके बाहेर काढले. त्यानंतर थेट काँक्रीटच्या बीमला आदळलं. या अपघातात राजेशला गंभीर दुखापत झाला. या भीषण अपघातात राजेशचा मृत्यू झाला.

स्वप्न पूर्ण करण्याआधीच राजेशचा जगाला निरोप

पोलिसांच्या माहितीनुसार, हॉटेल हे अविनाश नावाच्या व्यक्तीचे आहे. हॉटेल मालक अविनाश यांच्याशी राजेशची चांगली मैत्री होती. राजेशला देखील भविष्यात हॉटेल सुरू करायचं होतं. त्यामुळे तो हॉटेल व्यवसायात बारकाईने लक्ष देत होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी जयनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या हॉटेलमध्ये अनेक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पोलिसांकडून आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची तपासणी केली जात आहे. राजेशच्या मृत्यूने हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्याच्या मृत्यूने राजेशच्या कुटुंबीयावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हॉटेल सुरू करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याआधी त्याचा मृत्यू झाल्याने हॉटेल परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमराठी रिक्षा चालकांना मराठीसाठी वर्षभराची मुदत; शिवसेनेची नाराजी? प्रताप सरनाईक म्हणाले …
  • नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, हिरव्या साडीतील ही अप्सरा कोण? सौंदर्य पाहूनच चाहते…
  • Sunil Gavaskar: खेळाडू आणि कोचला दंड ठोठावा तरच हे वठणीवर येतील…सुनील गावस्कर भडकले, असं का म्हणाले?
  • तुमच्या नावावर एकापेक्षा जास्त SIM आहेत? नंबर बंद होणार; नवा नियम काय?
  • ॲडव्हेंचर लव्हर असाल तर भारतातील बेस्ट पॅराग्लायडिंग डेस्टीनेशनला भेट द्या..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in