
स्टार प्रवाह वाहिनीवर ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकेच्या कथानकासोबतच कलाकारांच्या भूमिकांचीही प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगताना दिसत आहे.
या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री अमृता धोंगडे ‘दर्शना लाड’ अर्थात ‘लाडबाई’ ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे. गोड बोलून समोरच्याला आपलंसं करणारी, मात्र स्वभावाने कपटी असलेली ‘लाडबाई’ हे पात्र अमृता वेगळ्या अंदाजात साकारताना दिसत आहे.
विशेष म्हणजे अमृता धोंगडे पहिल्यांदाच खलनायिकेची भूमिका साकारत आहे. त्यामुळे तिच्या या नव्या भूमिकेबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, अमृताने सोशल मीडियावर तिच्या साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती हिरव्या रंगाच्या साध्या साडीत आणि लाल रंगाच्या ब्लाऊजमध्ये दिसत आहे.
तिच्या या पारंपरिक लूकवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अमृताने यापूर्वी अनेक लोकप्रिय मालिका आणि चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करत प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.




Leave a Reply