• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुमच्या नावावर एकापेक्षा जास्त SIM आहेत? नंबर बंद होणार; नवा नियम काय?

August 30, 2026 by admin Leave a Comment


डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने नवीन आदेश जारी केला आहे. तर या नवीन नियमानुसार तुमच्या नावावर जर एकापेक्षा जास्त SIM कार्ड असतील, तर ते आता तुम्हाला वापरता येणार नाहीये. कारण तुमच्याकडे ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त मोबाईल कनेक्शन म्हणजेच सिमकार्ड असल्यास नियमांची कडक अंमलबजावणी होणार आहे. 24 ऑगस्ट 2026 पासून दूरसंचार कंपन्यांना केवळ कागदोपत्री नव्हे, तर तांत्रिक पातळीवर मजबूत यंत्रणा उभारण्यास सांगितले आहे.

दूरसंचार विभागाने (DoT) १७ ऑगस्ट रोजी याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार, एखाद्या व्यक्तीच्या नावावर आधीच ठरलेली SIM कार्डांची मर्यादा पूर्ण झाली असेल आणि तरीही त्याने नवीन SIM घेण्याचा प्रयत्न केला, तर दूरसंचार कंपनीकडून त्याची ओळख तपासली जाईल. तसेच, SIM कार्डांची निर्धारित मर्यादा पूर्ण झाल्यामुळे नवीन मोबाईल कनेक्शन देता येणार नाही, अशी माहिती ग्राहकाला स्पष्टपणे दिली जाईल. म्हणजेच, नवीन SIM घेण्यापूर्वी तुमच्या नावावर आधीपासून किती नंबर सुरू आहेत, हे तपासणं आता अधिक महत्त्वाचं ठरणार आहे.

तुमच्या नावावर किती SIM कार्ड असू शकतात?

नियमांनुसार, एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त ९ मोबाईल कनेक्शन असू शकतात. मात्र, जम्मू-काश्मीर, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये ही मर्यादा ६ SIM कार्डांची आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचे SIM असले तरी ते सर्व एकूण मर्यादेत मोजले जातात.

सरकार आता कशी देखरेख ठेवणार?

नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी दूरसंचार विभाग डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म (DIP) चा वापर करणार आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्यांकडील ग्राहकांची माहिती एकत्र केली जाईल. त्यामुळे एका व्यक्तीच्या नावावर एकूण किती मोबाईल कनेक्शन आहेत, हे सहज तपासता येणार आहे.

नवीन SIM घेताना, ग्राहकांना आपल्या नावावर आधीपासून असलेल्या सर्व मोबाईल कनेक्शनची माहिती देणे बंधनकारक असेल. यात इतर टेलिकॉम कंपन्यांचे SIM देखील समाविष्ट असतील.त्यामुळे नवीन SIM घेण्यापूर्वी आपल्या नावावर किती नंबर आहेत, हे तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

23 ऑगस्टपासून फोटोदेखील उपलब्ध

दूरसंचार विभागाच्या निर्देशांनुसार 23 ऑगस्टपासून, निर्धारित मर्यादेपर्यंत SIM असलेल्या ग्राहकांचे प्रतिनिधिक फोटो डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म (DIP) प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिले जातील. यामुळे नवीन SIM देताना टेलिकॉम कंपन्या या माहितीचा वापर करू शकतील. जर एखाद्या युजर्सने मर्यादेपेक्षा जास्त SIM असेल तेव्हा व्यक्तीचा चेहरा आणि आयडी ‘DIP’ वरून ट्रॅक करून नवीन सिम देण्याची प्रक्रिया रोखली जाईल.

नियमांचे पालन करा

दूरसंचार कंपन्यांना 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत त्यांच्या प्रणाली आणि प्रक्रिया डीआयपी (DIP) सोबत पूर्णपणे एकात्मिक करण्यास सांगण्यात आले आहे. अशातच तपासणी दरम्यान एका दिवसात मर्यादेपेक्षा एखाद्या ग्राहकाच्या नावावरील जास्त सिम कार्ड सुरू केल्याचे आढळले, तर ते अतिरिक्त सिम कार्ड एका दिवसाच्या आत तात्काळ निलंबित केले जाईल. ही कडक नियमावली टेलिकॉम कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून लागू करण्यात येत आहे, जेणेकरून बनावट कागदपत्रांच्या आधारे एकाच नावावर शेकडो सिम कार्ड ॲक्टिव्ह करून होणारे गुन्हे पूर्णपणे थांबवता येतील.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ना कसला दिखावा, ना मोठेपणा…दिग्गज क्रिकेटपटूने केला चक्क मेट्रोतून प्रवास, साधेपणाचं कौतुक, Photo Viral
  • Airtel, Jio की Vi, कोण ठरलं नंबर वन? TRAI चा रिपोर्ट समोर
  • सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच…
  • Vastu Shastra : कितीही प्रयत्न करा घरात धनच टिकत नाहीये? मग करा हे तीन सोपे उपाय, आयुष्यच बदलून जाईल
  • थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in