• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बोल्ड अभिनेत्रीचं नवीन गाणं चर्चेत, अंजली अरोराच्या टॉवेल डान्सने वेधलं सर्वांचं लक्ष, Video पाहून…

June 28, 2026 by admin Leave a Comment


Anjali Arora : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि रिअॅलिटी शो ‘लॉक अप’ मधून लोकप्रिय झालेली अंजली अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा नवीन म्युझिक व्हिडिओ ‘सजना है मुझे’ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यातील तिचा ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

हे गाणे 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सौदागर’ या चित्रपटातील दिग्गज गायिका आशा भोसले यांनी गायलेल्या अजरामर ‘सजना है मुझे’ या गाण्याचे आधुनिक रीमिक्स व्हर्जन आहे. जुन्या गाण्याचा गोडवा कायम ठेवत त्याला आधुनिक संगीत आणि आकर्षक व्हिज्युअल्सची जोड देण्यात आली आहे.

टॉवेल लूकमधील डान्सची चर्चा

या म्युझिक व्हिडिओमध्ये अंजली अरोरा केवळ टॉवेल परिधान करून डान्स करताना दिसते. तसेच काही सीनमध्ये ती बाथरूममध्ये अंघोळ करतानाही दाखवण्यात आली आहे. तिचा हा बोल्ड आणि स्टायलिश अवतार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला असून, व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि प्रतिक्रिया मिळत आहेत.

अंजलीचा हा टॉवेल लूक पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांना ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या सुपरहिट चित्रपटातील अभिनेत्री काजोलची आठवण झाली. त्या चित्रपटातील ‘जरा सा झूम लूं मैं’ या गाण्यात काजोलने टॉवेल परिधान करून केलेला डान्स आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्यामुळे अंजलीच्या या नव्या व्हिडिओची त्या डान्ससोबत तुलना केली जात आहे.

चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद

या रीमिक्स गाण्याला लोकप्रिय गायिका श्रुती राणे हिने आपल्या मधुर आवाजाने सजवले आहे. आधुनिक संगीत संयोजन आणि आकर्षक चित्रीकरणामुळे हे गाणे नव्या पिढीच्या पसंतीस उतरत आहे.

म्युझिक व्हिडिओमध्ये अंजली अरोराने आपल्या ग्लॅमरस लूक, दमदार डान्स मूव्ह्ज आणि आकर्षक हावभावांमुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिच्या स्टाइल आणि स्क्रीन प्रेझेन्सचे सोशल मीडियावर कौतुक होत असून, अनेक चाहते तिच्या या नव्या अवताराचे स्वागत करत आहेत. दरम्यान, ‘सजना है मुझे’ या क्लासिक गाण्याच्या आधुनिक सादरीकरणामुळे जुन्या गाण्यांची नव्या पिढीशी पुन्हा एकदा ओळख करून देण्याचा प्रयत्न यशस्वी ठरत असल्याची चर्चा संगीतप्रेमींमध्ये रंगली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारतीय संघ ‘या’ संघाविरुद्ध खेळणार टी-20 मालिका, बीसीसीआयने नकार कळवण्यामागचे कारण काय?
  • ‘लापता लेडीज’मधील अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी? रडत-रडत शेअर केला व्हिडीओ
  • आजही प्रत्येक पार्टीची शान आहे ‘मौजा ही मौजा’ गाणं; पण सुरुवातीचे बोल आहेत या भाषेत
  • Ketan Agarwal Case : जिवंत आहे केतन… ऐकताच सियाच्या पायाखालची जमीन सरकली, पोलिसांकडे 3 मोठे पुरावे
  • फक्त अजून दोन पावलं अन् थेट 100 कोटींचा विक्रम; ‘देऊळ बंद 2’चा अटकेपार झेंडा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in