
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री विजयश्री आहे. तिचे शेवटचे दिवस फार कठीण होते. फार कमी वयात अभिनेत्रीने स्वतःची ओळख निर्माण केली. तिच्या सौंदर्याची देखील फार चर्चा रंगायची.
ग्लॅमरस भूमिकांमुळे विजयश्री यांची प्रतिमा 'सेक्स सिम्बॉल' म्हणून झालेली. एवढंच नाही तर, एका सिनेमातील सीनमुळे त्या एवढ्या त्रस्त झालेल्या की, त्यांचा मानसिक ताण वाढला. या सीनमुळे त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं, असेही काही दावे करण्यात आले.
रिपोर्टनुसार, 'पोननापुरम कोट्टा' सिनेमाच्या शुटिंगदरम्यान एक धबधब्याच्या सीनमध्ये विजयश्री यांनी पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातलेला. पण पाण्यच्या प्रवाहामुळे ड्रेस सरकला आणि कॅमेऱ्या आक्षेपार्ह फुटेज कैद झालं. अभिनेत्रीला आधी सांगण्यात आलं की, सीन काढले जातील.
पण त्यातील काही भाग सिनेमात तसेच ठेवण्यात आले. ज्यामुळे विजयश्री यांना मोठा धक्का बसला, ज्याचा त्यांना प्रचंड त्रास झाला. त्यानंतर त्यांनी स्वतःला संपवलं. अभिनेत्रीच्या निधनानंतर इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली.
फार कमी वयात अभिनय विश्वात पदार्पण केल्यानंतर आपल्यासोबत असं काही होईल याची कल्पना देखील विजयश्री यांनी केली नव्हती. अशाच 17 मार्च 1974 रोजी वयाच्या अवघ्या 21 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण त्यांच्या मृत्यूचं कारण आजही अस्पष्ट आहे.




Leave a Reply