• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बुमराह, सुदर्शन आणि आता…! टीम इंडियाला तिसरा धक्का बसण्याची शक्यता, हा खेळाडू मालिकेला मुकणार

August 12, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पण या तयारीत सुरूवातीलाच विघ्न आलं.  दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघाला जुळवाजुळव करताना कठीण गेलं. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकला. त्यानंतर साई सुदर्शन खेळणार की नाही यावरून संभ्रम होता. सराव सामना होईपर्यंत त्याचं खेळणं निश्चित मानलं जात होतं. पण दुखापतीतून काही सावरला नाही. त्यामुळे त्याचीही रिप्लेसमेंट द्यावी लागली. जसप्रीत बुमराहच्या जागी आकिब नबी आणि साई सुदर्शनच्या जागी सरफराज खानची संघात नियुक्ती झाली. आता फिरकी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याचं खेळणं कठीण मानलं जात आहे. दुखापतीतून अजून सावरलेला नाही. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरही या मालिकेला मुकण्याची शक्यता वाढली आहे.

वॉशिंग्टन सुंदर श्रीलंकेत जाण्याची शक्यता कमीच

श्रीलंका कसोटी मालिकेसाठी संघ निवडताना वॉशिंग्टन सुंदरची निवड केली होती. दुखापतग्रस्त असूनही त्याला संघात निवडलं होतं. इतकंच काय तर फक्त दुसर्‍या कसोटीत खेळेल असंही बोललं जात होतं. कारण दुसरा कसोटी सामना 23 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पण आता दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी वॉशिंग्टन सुंदर फिट होणं कठीण आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, संघ व्यवस्थापन वॉशिंग्टन सुंदरबाबत कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरचं श्रीलंका दौऱ्यावर जाणं कठीण दिसत आहे.

भारतीय संघाला गेल्या काही दिवसांपासून दुखापतीचं ग्रासलं आहे. इंग्लंड दौऱ्यावर असताना वॉशिंग्टन सुंदरला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली होती. त्यानंतर श्रीलंका दौऱ्यात खेळेल की नाही याबाबत साशंकता होती. असं असूनही त्याची निवड श्रीलंका दौऱ्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी केली होती. पण वॉशिंग्टन सुंदरचा मागचा काही अनुभव पाहता आता बीसीसीआय ताकही फुंकून पित आहे. कारण मागेही वॉशिंग्टन सुंदर फिट असल्याचा घोषणा केल्या गेल्या. मात्र एक दोन सामने खेळल्यानंतर पुन्हा दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याच्या बाबतीत कोणतीही जोखीम घेण्याबाबत स्पष्ट नकार दिसत आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: दहा दिशेला दहा तोंडं करून बसलोय, तुकाराम मुंढेंचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना सज्जड दम; जीन्स-टीशर्टवरूनही सुनावलं
  • मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये श्रीमंतांची कोट्यवधींची गुंतवणूक; 10 लक्झरी प्रोजेक्ट्समध्ये 3,815 कोटींच्या घरांची विक्री
  • Govinda : गोविंदा – सुनीता यांच्या वादावर घरातल्याच सदस्याचं मोठं वक्तव्य, नेमकं सुरु तरी काय?
  • VIDEO : 10 बाय 10 ची रुम, नोटांनी भरलेल्या 30 बॅगा, महिला भिकाऱ्याच्या घरात इतका पैसा मिळाला, आकडा ऐकून थक्क व्हाल
  • Govinda: गोविंदा-सुनीताचा आणखी एक मोठा निर्णय; वैवाहिक आयुष्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in