• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बापाला काहीही करून वाचवायचंय..; ‘सैराट’ फेम अरबाजच्या व्हिडीओनंतर रुग्णालयाने मांडली बाजू

July 9, 2026 by admin Leave a Comment


नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटात परश्याचा जिवलग मित्र सल्याची भूमिका साकारून अभिनेता अरबाज शेख घराघरात पोहोचला. सध्या अरबाज त्याच्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. अरबाजच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाला असून उपचारासाठी त्यांना सोलापुरातल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयाकडून पैशांची लूट होत असल्याचा आरोप करत अरबाजने चाहत्यांकडे मदतीची विनंती केली आहे. आता अरबाजच्या आरोपांवर रुग्णालयाच्या प्रमुखांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अरबाजने केलेले आरोप चुकीचे आहेत, असं सोलापुरातील नोबल हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अमजद सय्यद यांनी म्हटलंय.

अरबाजने त्याच्या वडिलांना सोलापुरातल्या नोबल हॉस्पिटमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं. मात्र आमच्याच मेडिकलमधून औषधं घेणं बंधनकारक असल्याचं म्हणत त्यांनी पैशांची लूट केल्याचा धक्कादायक आरोप अरबाजने केला आहे. बाहेरून ज्या औषधांचा खर्च निम्म्या किंंमतीत झाला असता, तोच तिथे रुग्णालयात 40 हजार रुपयांचा बिल झाल्याचं त्याने सांगितलं. यामुळे त्याने वडिलांना तिथून दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला. या आरोपांवर नोबल हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अमजद सय्यद यांनी रुग्णालयाची बाजू मांडली आहे. ते म्हणाले, “औषधं आमच्याकडूनच घेण्याबाबत आम्ही कधीही कोणालाही अनिवार्य करत नाही. मुळात दोन दिवसांपूर्वीच त्या रुग्णाने डिस्चार्ज घेतला आहे. मात्र तरीही त्यांनी असे आरोप का केले, याबाबत कल्पना नाही. तसंच रुग्णाच्या एकूण खर्चाबाबत आम्ही त्यांना आधीच कल्पना दिलेली होती.”

अरबाजचा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by मराठी वाहिनी 🎙 (@marathivaahini)

“याच्याआधी आम्ही पप्पांना जिथे दाखल केलं होतं, तिथे आम्हाला बाहेरून गोळ्या घेता येत नव्हत्या. हे चाळीस हजारांचं बिल बाहेरून कदाचित वीस हजारांपर्यंत झालं असतं. पण इथे एवढी लूट होतेय, माझ्या बापाला मला मरताना पहायचं नाहीये. म्हणून त्यांना मला या रुग्णालयातून दुसरीकडे शिफ्ट करावं लागतंय. इथला माझा अनुभव खूपच वाईट आहे. जाणकरांनी मला सांगावं की माझ्या वडिलांना उपचारासाठी कुठे दाखल करावं? मला आता काहीच कळत नाहीये, पण माझ्या बापाला मला काहीही करून वाचवायचं आहे. मला प्लीज मदत करा,” अशी विनंती अरबाजने व्हिडीओमार्फत केली आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप
  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?
  • शाहरुख खानला चूक भोवणार? FDA च्या नोटिशीवर तुकाराम मुंढेंची मोठी माहिती; नेमकं काय सांगितलं?
  • अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी, पण एक अट करावी लागणार पूर्ण, आता वर्षभर…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in