• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बंदुकीच्या परवाण्यासाठी आले अन्… डॉक्टर राजेंद्र रुपनवर प्रकरणात खळबळ, थेट राज्यातील बड्या नेत्याच्या..

September 1, 2026 by admin Leave a Comment


साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी धक्कादायक निर्णय घेतला. त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला. वरिष्ठांवर गंभीर आरोप करण्यात आली. हेच नाही तर याप्रकरणात दादर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला. हातावर नोट लिहून राजेंद्र रुपनवर यांनी आयुष्याचा शेवट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र, त्यांना वाचवण्यात यश आले नाही. फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय उपाधीक्षक डॉ. लीला मदने आणि कोंडे देशमुख यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी कुटुंबियांकडून केली जात आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी कुटुंबाची भुमिका आहे. गंभीर आरोप करण्यात आलीत.

25 दिवस झाले तरी न्याय मिळाला नाही, लिला यांनी प्रचंड छळ केला. बंदुकीच्या परवाण्यासाठी आले, त्याला फिटनेस प्रमाणपत्र दिले. कोंडे देशमुख यांच्याकडून अरे तुरे भाषा आणि त्यांच्या बॉडिगार्डकडून मारहाण झाली. रुग्णालयाकडून त्रास देण्यात आला ,पगार वेळेवर दिला जात नव्हता, असे आरोप राजेंद्र रुपनवर यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आली. या प्रकरणात ज्या देशमुखचा उल्लेख केला जात आहे, ते तानाजी सावंत यांचे पीए असल्याचे सांगितले जातंय.

लिला मदणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कोंडे देशमुख आणि मदने यांच्यावर कारवाई व्हावी, ह्या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हावी, अशी कुटुंबियांची मागणी आहे. ह्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कुटुंबियांची आहे. या प्रकरणात आता अनेक राजकीय नेत्यांनीही आवाज उठवण्यास सुरूवात केली.

आमदार रोहित पवार यांनीही एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत यावर भाष्य केले. संपदा मुंडे प्रकरणाप्रमाणेच यामध्येही काही नेत्यांची थेट नावे पुढे येत आहेत. पोलिसांकडून या प्रकरणात तपास केला जात आहे. लिला मदने यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. आमच्या मुलाला कसा त्रास दिला जात होता, हे कुटुंबियांकडून सांगितले जात आहे. या प्रकरणात अजून काही लोकांवर गुन्हे दाखल होण्याच शक्यता आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डॉ. राजेंद्र रुपनवर प्रकरणात ट्विस्ट, जबाब अचानक कसा बदलला? आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची पहिली प्रतिक्रिया समोर
  • सप्टेंबर महिना या 5 राशींसाठी ठरणार लाभदायक, चौथ्या राशीच्या जीवनात धन आणि प्रतिष्ठेत वाढ
  • Indus Water Treaty : सिंधू जल कराराचा निर्णय बाजूने लागताच पाकिस्तानला लगेच माज चढला, हिना रब्बानी खार यांनी भारताविरोधात ओकली गरळ
  • Todays Gold Rate: Import Duty कमी होणार अशी चर्चा रंगताच किमती धाडकन कोसळल्या, सोन्याचा आजचा भाव किती?
  • Rajat Bedi : वयाच्या 51 व्या रजत बेदीची नवी सुरुवात, म्हणाला, ‘माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी सुद्धा…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in