• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फ्रीझरमध्ये आमरस ठेवताना करा घरगुती जुगाड, वर्षभर घ्या आंब्याचा आस्वाद

April 29, 2026 by admin Leave a Comment


उन्हाळा आला की सर्वांना गोड रसाळ आंब्यांचे आणि आमरसाचे वेड लागते. एकदा उन्हाळा संपला की आमरस खाण्याची इच्छा असूनही आपल्याला पुढच्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागते.

mango 5

पण आता तुम्हाला तुमची ही इच्छा मारण्याची गरज नाही. काही खास पद्धतींचा वापर करून तुम्ही आमरस केवळ काही दिवसच नाही, तर संपूर्ण वर्षभर ताजा आणि पिवळाधमक ठेवू शकता.

mango 3

आमरस वर्षभर टिकवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी पल्प स्टोअर करु शकता. हे करण्याची एक सर्वात सोपी आणि लोकप्रिय पद्धत आहे. यासाठी शक्यतो हापूस किंवा केशर आंबे निवडा. आंबे पूर्णपणे पिकलेले आणि डाग विरहित असावेत.

mango 4

आंबे नीट धुवून व सोलून त्यांचा पल्प काढून घ्या. मिक्सरचा वापर करण्याऐवजी हाताने रस काढा. तसेच त्यात कोय घालून ठेवा, जेणेकरुन तो काळा पडत नाही.

mango 2

आमरसामध्ये चवीनुसार साखर मिसळा. साखरमुळे आमरसाची फक्त चव वाढवत नाही, तर ती नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून काम करते, ज्यामुळे रस दीर्घकाळ टिकतो. हा रस प्लास्टिकच्या एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा झिप-लॉक बॅगमध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवा.

mango

जर तुम्हाला रसाऐवजी आंब्याच्या फोडी साठवायच्या असतील, तर आंब्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. एका ट्रेमध्ये हे तुकडे एकमेकांना न चिकटवता ठेवून २-३ तास फ्रीझरमध्ये ठेवा. हे तुकडे पूर्णपणे गोठल्यावर ते एका झिप-लॉक बॅगमध्ये भरून पुन्हा फ्रीझरमध्ये ठेवा. जेव्हा हवे तेव्हा तुम्ही या फोडींचा रस किंवा मँगो शेक बनवू शकता.

mango 6

आमरस स्टोअर करताना त्यात चुकूनही दूध किंवा पाणी घालू नका. यामुळे रस लवकर खराब होऊ शकतो. खाताना तुम्ही आवडीनुसार दूध घालू शकता. तसेच आमरसाच्या डब्यात आंब्याची एखादी स्वच्छ केलेली कोय टाकल्यास रस नैसर्गिकरित्या पिवळाधमक राहतो. काळा पडत नाही.

mango 7

आमरस ठेवण्यासाठी नेहमी एअरटाईट कंटेनर वापरा, जेणेकरून फ्रीझरमधील इतर पदार्थांचा वास त्याला लागणार नाही. या सोप्या टिप्स वापरून तुम्ही फक्त उन्हाळ्यातच नव्हे, तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यातही आमरसाचा आनंद घेऊ शकता.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 5 सुपर पॉवर झाडं, एकजरी लावलं तरी साप घरात सुद्ध डोकावणार नाही, आदिवासी पाड्यांवर हमखास दिसतात
  • विधानपरिषदेचे तिकीट मिळताच अंबादास दानवेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, उद्धव ठाकरेंनी…
  • Women T20 WC 2026: इंग्लंडनंतर न्यूझीलंड संघाची घोषणा, या दोन खेळाडूंचा शेवटचा वर्ल्डकप
  • Pratap Sarnaik | आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास…प्रताप सरनाईक यांचा इशारा; सरकारचे पुढचे पाऊल!
  • ठाकरे गटाचे धक्कातंत्र, उद्धव ठाकरे नव्हे तर या नेत्याला विधानपरिषदेची उमेदवारी, ऐनवेळी मोठी घोषणा!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in