• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ठाकरे गटाचे धक्कातंत्र, उद्धव ठाकरे नव्हे तर या नेत्याला विधानपरिषदेची उमेदवारी, ऐनवेळी मोठी घोषणा!

April 29, 2026 by admin Leave a Comment


राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जाणार असल्याचे बोलले जात होते, मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अंबादास दानवे यांना महाविकास आघाडीचे तिकीट देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे आता काँग्रेसला हा निर्णय मान्य आहे का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अंबादास दानवे विधान परिषदेवर जाणार

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी चर्चा रंगली होती, मात्र उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी नको असल्याच्याही बातम्या समोर येत होत्या. आज अखेर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर जाणार नसल्याची माहिती देत अंबादास दानवे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी माहिती दिली आहे. या आधीही दानवे यांनी विधान परिषदेत विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिलेले आहे.

संजय राऊतांनीही दिली माहिती

अंबादास दानवे यांच्या उमेदवारीच्या घोषणेबाबत संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. राऊत यांनी म्हटले की, अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील. उद्या 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केली.

काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

याआधी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीला आमचा पाठिंबा असल्याची माहिती दिली होती. मात्र आता उद्धव ठाकऐवजी अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता या निवडणुकीत काँग्रेसकडूनही उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे.

भाजपाकडूनही उमेदवारांची यादी जाहीर

भाजपाकडून उमेदवारी मिळावी यासाठी राज्यातील बऱ्याच बड्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात होते. वरिष्ठांच्या भेटीगाठी घेतल्या जात होत्या. परंतु भाजपाने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. भाजपाने यावेळी माधवी नाईक, सुनिल कर्जतकर, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. तर विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Video : बॅटमध्ये AI चिप असल्याचा आरोप, वैभव सूर्यवंशीने एका वाक्यात संपवला विषय
  • पोस्ट ऑफिसची NSC योजना, 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर मिळवा 7.7 टक्के व्याज, जाणून घ्या सर्व नियम आणि फायदे
  • 690 किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, हुंडई आयोनिक 5 फेसलिफ्ट भारतात लाँच
  • मोठी बातमी! इराणमध्ये सत्तापरिवर्तन, मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल हादरवणारी माहिती, जगभरात मोठी खळबळ
  • Motorola घेऊन येत आहे त्यांचा नवीन फोल्डेबल स्मार्टफोन, किंमत आणि दमदार फिचर्स झाले लीक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in