• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! इराणमध्ये सत्तापरिवर्तन, मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल हादरवणारी माहिती, जगभरात मोठी खळबळ

April 29, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये तब्बल 40 दिवस युद्ध सुरू होतं. अखेर 40 व्या दिवशी इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धविराम झाला. मात्र जरी युद्धविराम झाला असला तरी देखील अजूनही स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये तणाव कायम आहे. इराण आणि अमेरिकेमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार इराणला धमक्या दिल्या जात आहेत. तसेच इराण शरण आल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. मात्र याचदरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे इराणमध्ये सत्ता परिवर्तन झाल्याचं बोललं जात आहे. रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार आता इराणचे नवे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई हे इराणचे केवळ नामधारी प्रमुख झाले आहेत. आता इराणची सर्व सत्ता ही इस्लामिक रिव्हेल्यूशनरी गार्ड (IRGC) च्या काही प्रमुख कमांडरच्या हाती एकवटली आहे. तेच सध्या इराणसंदर्भातील सर्व निर्णय घेत आहेत. मात्र दुसरीकडे इस्लामिक रिव्हेल्यूशनरी गार्ड (IRGC) मुळेच चर्चा फिसकटल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला आहे.

एका रिपोर्टनुसार आयआरजीसीच आता इराणमधील सर्व महत्त्वाचे निर्णय घेत आहे, इराणचे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई हे केवळ नामधारी प्रमुख झाले आहेत. इस्लामिक रिव्हेल्यूशनरी गार्डकडून इराणसंदर्भातील सर्व प्रमुख निर्णय घेतले जात आहेत, निर्णय घेतल्यानंतर ते निर्णय खामेनेई यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहेत, म्हणजे त्यांना केवळ त्यासंदर्भात माहिती देण्यात येत आहे. या निर्णयामध्ये खामेनेई यांचं मत देखील विचारात घेतलं जात नाहीये.

दरम्यान युद्धाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 मार्च रोजी अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यामध्ये इराणचे सुप्रीम लीडर अयतुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनं संपूर्ण इराणमध्ये मोठी खळबळ उडाली होती. तुम्ही जर सुप्रीम लीडर म्हणून दुसऱ्या नेत्याच्या नावाची घोषणा केली तर आम्ही त्यांना देखील मारू असा इशारा इस्त्रायलकडून इराणला देण्यात आला होता. दरम्यान त्यानंतर इराणकडून सुप्रीम लीडर म्हणून मोजतबा खामेनेई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र सुप्रीम लीडर झाल्यापासून मोजतबा खामेनेई हे अजूनही अंडरग्राउंडच आहेत, ते एकदाही समोर आलेले नाहीत. तसेच जेव्हा अमेरिका आणि इस्त्रायलने अयतुल्ला अली खामेनेई यांच्यावर हल्ला केला होता, त्याच हल्ल्यात मोजतबा खामेनेई हे देखील जखमी झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र आता त्यांची प्रकृती बरी आहे, परंतु सध्या इराणची सत्ता इस्लामिक रिव्हेल्यूशनरी गार्डने हायजॅक केल्याचं पहायला मिळत आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Bajaj Chetak आता झाला हायटेक! जास्त स्पीड, फास्ट चार्जिंग आणि गुगल मॅप्स सपोर्टसह नवीन अपडेट लाँच
  • भैय्यांना मराठी शिकवलं तर ते उद्या…, राज ठाकरेंची मिश्कील टिप्पणी, दिलं ओपन चॅलेंज..
  • Baranmati Bypoll Election Exit Poll | बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार? कोणाचा वरचष्मा; वाचा काय होणार?
  • उन्हामुळे गाईंची तब्येत बिघडली; फॉगर बसवत शेतकऱ्याचा तापमान नियंत्रणाचा अनोखा प्रयोग…
  • 30 April 2026 Horoscope : महिन्याच्या शेवटच्या दिवशी नशीब फळफळणार, 3 राशींच्या आयुष्यात घडणार चमत्कारिक गोष्टी!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in