• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Baranmati Bypoll Election Exit Poll | बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार? कोणाचा वरचष्मा; वाचा काय होणार?

April 29, 2026 by admin Leave a Comment


देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आता सर्वांचे लक्ष 4 मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालांकडे लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये आज शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडले, तर आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी येथे यापूर्वीच मतदान पूर्ण झाले होते. यासोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांचाही समावेश या प्रक्रियेत आहे. या दोन्ही ठिकाणी 23 एप्रिल रोजी मतदान पार पडले होते.

दरम्यान, निकालापूर्वी विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर येऊ लागले असून, त्यामध्ये राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत महत्त्वाचे संकेत मिळत आहेत.  रुद्र रिसर्चच्या एक्झिट पोलनुसार, भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. या अंदाजानुसार कर्डिले यांना सुमारे 1 लाख 42 हजार 500 मते मिळण्याची शक्यता असून, एकूण मतदानापैकी सुमारे 76 टक्के मतांचा वाटा त्यांच्या बाजूने जाऊ शकतो.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार गोविंद मोकाटे यांना सुमारे 25 हजार 500 मते मिळण्याचा अंदाज असून, त्यांचा मतांचा टक्का सुमारे 14 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहू शकतो. तसेच वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांनीही या निवडणुकीत आपले आव्हान उभे केले होते.

एकूणच, या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले मोठ्या फरकाने विजयी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्ष निकालानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • राज्याच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार, शिंदे गटात पडद्यामागे मोठ्या हालचाली; आज रात्रीच एकनाथ शिंदे…
  • उद्धव सायेबांचं मन लई मोठं हाय… लेकाला उमेदवारी मिळताच मायच्या डोळ्यात अश्रू, अंबादास दानवेंच्या घरातील भावूक क्षण
  • गुरु-शुक्राची युती घडवून आणणार गजलक्ष्मी राजयोग; या ५ राशींसाठी असेल पैसा आणि प्रेमाचा डबल धमाका!
  • तुझ्यावर मोठ्ठं संकट येणार… महिला घाबरली, लाखोंची फसवणूक, अखेर ‘टनटन बाबा’ आणि ‘लहरी बाबा’ पकडला
  • Rahuri Exit Poll 2026 : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत काय होणार? कोण मारणार बाजी? भाजप की राष्ट्रवादी शरद पवार गट?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in