• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होणार? शरद पवार गट NDA सोबत जाणार? राष्ट्रवादीची ‘इनसाईड स्टोरी’ समोर

July 14, 2026 by admin Leave a Comment


राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार आणि आमदार फुटले. त्यानंतर आता शरद पवार गट देखील मोठी भूमिका घेण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दहापैकी 9 आमदारांची मते मंत्री जयंत पाटील यांनी जाणून घेतली. त्यानंतर खासदारांशी देखील बोलल्याची माहिती आहे. आता पक्षाध्यक्ष शरद पवारांशी बोलून निर्णय घेऊ, असे जयंत पाटील यांनी खासदार-आमदारांना सांगितला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकीकडे पावसाळी अधिवेशनचा शेवटचा टप्पा सुरू आहे. दुसरीकडे शरद पवार गटाच्या आमदाराची विधान भवनात बैठक झाली. या बैठकीला रोहित पवार सोडून पक्षाचे 9 आमदर होते. या बैठकीत जयंत पाटील यांनी सर्व आमदारांची चर्चा करून मते जाणून घेतली. सर्व आमदारांचा भाजपकडे जाण्याचा कल आहे, अशी माहिती आहे. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत न जाता भाजप प्रणित एनडीएचा घटक पक्ष बनावे, अशी सूचना आमदारांनी दिल्याची माहिती आहे.

रोहित पवार बैठकीसापासून अलिप्त?

मतदारासंघातील विकासकामांसाठी निधी, 2029 च्या निवडणुकीत चांगलं यश मिळवण्यासाठी भाजप आणि एनडीएसोबत जाणे आवश्यक असल्याचे मत आमदारांनी सांगितले. आता चेंडू शरद पवारांच्या कोर्टात गेला आहे. एनडीएसोबत जाणाच्या पर्यायावर शरद पवार काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. याबाबत लवकरच कळवले जाईल, असेही जयंत पाटील यांनी आमदारांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. तत्पूर्वी, 9 आमदारांच्या बैठकीपासून आमदार रोहित पवार दूर होते. त्यांचा भाजपसोबत जाण्यास तीव्र विरोध असल्याचे समजतेय. या बैठकीनंतर रोहित पवारांनी देखील सर्व आमदारांशी फोनवर बोलून मत जाणून घेतल्याचे कळतंय. यानंतर आता शरद पवार स्वत: मैदानात उतरणार असल्याची माहिती मिळतेय. ते आता थोड्या दिवसांत आमदार आणि खासदारांची बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीनंतर शरद पवार गट काय निर्णय घेणार, हे स्पष्ट होईल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in