• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Women T20 WC 2026: इंग्लंडनंतर न्यूझीलंड संघाची घोषणा, या दोन खेळाडूंचा शेवटचा वर्ल्डकप

April 29, 2026 by admin Leave a Comment


वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी न्यूझीलंडने आपल्या संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडनंतर संघाची घोषणा करणारा दुसरा संघ ठरला आहे. न्यूझीलंडने आपल्या संघातील 15 खेळाडूंची नाव घोषित केली आहेत. (Photo: WHITE FERNS Twitter)

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी न्यूझीलंडच्या वुमन्स संघाची धुरा अमेलिया केरच्या हाती असणार आहे. या संघात दोन वरिष्ठ खेळाडूंना संधी मिळाली आहे. त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील हा शेवटचा वर्ल्डकप आहे. हे दोन्ही खेळाडू टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर निवृत्त होणार आहेत. (Photo: WHITE FERNS Twitter)

गतविजेत्या न्यूझीलंडच्या 15 सदस्यीय संघत सहभागी असलेल्या सोफी डिव्हाईन आणि ली ताहुहूसाठी हा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. या दोघांनी टी20 वर्ल्डकपनंतर निवृत्ती घेणार असल्याचं आधीच घोषित केलं आहे. (Photo: WHITE FERNS Twitter)

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी न्यूजीलंडचा संघ : अमेलिया केर (कर्णधार), सूजी बेट्स, सोफी डिव्हाइन, फ्लोरा डिवोनशर, इजी गेज, मॅडी ग्रीन, ब्रूक हालीडे, ब्री इलिंग, पोली इंग्लिस, जेस केर, रोजमॅरी मायर, नेन्सी पटेल, जॉर्जिया प्लीमर, इजी शार्प, ली ताहुहू. (Photo: WHITE FERNS Twitter)

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा 12 जूनपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद इंग्लंडकडे आहे. न्यूझीलंडचा या स्पर्धेतील पहिला सामना 13 जूनला वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत एकूण 12 संघ असून दोन गट पडले आहेत. ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, भारत, नेदरलँड, पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिका एका गटात आहेत. तर इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंड, स्कॉटलँड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज एका गटात आहेत. (Photo: WHITE FERNS Twitter)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • साठीच्या उंबरठ्यावर माधुरी दीक्षित, तरीही तरुणींना देतेय फॅशन गोल्स
  • Explainer : उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची आमदारकी का नाकारली? 5 मोठी कारणं समोर
  • मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण? दिग्गज नेत्यासह या 5 जणांची नावे चर्चेत
  • आमदारकी, खासदारकी 100 वेळा…दानवेंना तिकीट मिळताच सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ; नाराजीच्या चर्चेचा विषयच संपवला!
  • बाबासाहेबांच्या नावाने नवी शिष्यवृत्ती, राज्यात नवा आयोग, मंत्रिमंडळ बैठकीत 8 सर्वात मोठे निर्णय!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in