• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण? दिग्गज नेत्यासह या 5 जणांची नावे चर्चेत

April 29, 2026 by admin Leave a Comment


विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काही दिवसांपासून उद्धव ठाकरे हे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे यांचा विधानपरिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आता विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीतील रंगत आणखी वाढणार आहे. या निवडणुकीसाठी 5 नेत्यांची नावे चर्चेत आहेत, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काँग्रेसकडून या नावांची चर्चा

हर्षवर्धन सपकाळ यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्याची घोषणा केली आहे. आता या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 5 नावे चर्चेत आहेत. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सचिन सावंत, अतुल लोंढे, नसीम खान आणि राजेश राठोड यांच्या नावांचा समावेश आहे. यातील बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे, त्यांना सभागृहाचा प्रचंड अनुभव आहे, त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा होता, मात्र…

महत्त्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी काँग्रेसने जाहीर केले होते की, उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास आमचा पाठिंबा असेल, मात्र जर दुसरा कोणी उमेदवार असेल तर आम्ही उमेदवार देणार. त्यानुसार अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करून उमेदवार देणार असल्याची माहिती दिली आहे. आता वरीलपैकी एका नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय?

अंबादास दानवे यांचं नाव जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे यांनी म्हटले की, ‘राज्यसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीने शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता. त्याचवेळी आम्ही विधानसभेला शिवसेनेचा जो उमेदवार असेल त्याला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषेदत असावेत, अशी आमची मागणी होती. मात्र आता अंबादास दानवेंना त्यांनी संधी दिली आहे, तर आमची काही हरकत नाही.’



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Bajaj Chetak आता झाला हायटेक! जास्त स्पीड, फास्ट चार्जिंग आणि गुगल मॅप्स सपोर्टसह नवीन अपडेट लाँच
  • भैय्यांना मराठी शिकवलं तर ते उद्या…, राज ठाकरेंची मिश्कील टिप्पणी, दिलं ओपन चॅलेंज..
  • Baranmati Bypoll Election Exit Poll | बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार? कोणाचा वरचष्मा; वाचा काय होणार?
  • उन्हामुळे गाईंची तब्येत बिघडली; फॉगर बसवत शेतकऱ्याचा तापमान नियंत्रणाचा अनोखा प्रयोग…
  • 30 April 2026 Horoscope : महिन्याच्या शेवटच्या दिवशी नशीब फळफळणार, 3 राशींच्या आयुष्यात घडणार चमत्कारिक गोष्टी!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in