
गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधान परिषद निवडणुकीबाबात वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. भाजपने यादी जाहीर केल्यानंतर ठाकरे गटानेही आपला उमेदवार जाहीर केला आहे. ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा अंबादास दानवे यांना विधान परिषदेचे तिकिट देण्यात आले आहे. सकाळपर्यंत या तिकिटासाठी ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, अंबादास दानवे यांचे नाव जाहीर करताच सुषमा अंधारे यांनी शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
काय आहे सुषमा अंधारे यांची पोस्ट?
विधान परिषदेसाठी ठाकरे गटातून खुद्द उद्धव ठाकरे यांनी अर्ज दाखल करावा असा आग्रह महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता. पण, आज महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे यांना तिकिट देण्यात आल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांना ओवाळतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी ‘आमदारकी खासदारकी आपल्या वरून 100 वेळा कुर्बान’ असे कॅप्शन दिले आहे.
भाजपचे उमेदवार कोण?
भाजपाने यावेळी माधवी नाईक, सुनिल कर्जतकर, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. तर विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे.
Leave a Reply