
Assam Election Exit Polls Result : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी तामिळनाडू या राज्या महत्त्वाच्या राज्यांत विधानसभेची निवडणुकीची चर्चा आहे. या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाने प्रचंड ताकद लावली होती. तर आसामममध्येही आपली सत्ता कायम राहावी यासाठी जोमात प्रचार केला होता. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील निवडणकू संपल्यानंतर आता या चार राज्य आणि एका केंद्रशाशित प्रदेशांच्या निवडणुकीचे एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर घडून येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आसाममध्येही भाजपाला मोठा विजय मिळण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमध्ये नेमकी कोणाची सत्ता येणार?
सध्याच्या एक्झिट पोलनुसार आसाममध्ये भाजपा पुन्हा एकदा आपली सत्ता कायम रखण्याची शक्यता आहे. तसे आकडे समोर आले आहेत. आसाममध्ये एकूण 126 जागांवर निवडणूक झाली होती. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने चांगलीच ताकद लावली होती. भाजपाचे केंद्रातील बडे नेते या राज्यात प्रचारासाठी गेले होते. आता एक्झिट पोलनुससार भाजपाला सत्ता मिळू शकते. अॅक्सिज माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार आसाममध्ये एनडीएला 88 ते 100 जागा मिळू शकताात. तर काँग्रेसला 24 ते 36 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच येथे भाजपाप्रणित सरकार येण्याची शक्यता आहे.
टीप- एक्झिट पोलचे आकडे खरेच असतात असे नाही. प्रत्यक्ष मतमोजणीनंतरच कोणाची सत्ता येईल, हे स्पष्ट होईल. एक्झिट पोलच्या आकड्यांवरून कोणचाा विजय होणार याचा फक्त अंदाज बांधता येतो.
Leave a Reply