• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

5 सुपर पॉवर झाडं, एकजरी लावलं तरी साप घरात सुद्ध डोकावणार नाही, आदिवासी पाड्यांवर हमखास दिसतात

April 29, 2026 by admin Leave a Comment


उन्हाळ्याचे दिवस आहेत, यंदाचा उन्हाळा तर अधिक कडक आहे. देशातील टॉप टेन उष्ण शहरांमध्ये पहिल्या चार क्रमांकांवर महाराष्ट्रातील शहरांचा समावेश आहे. उन्हाळ्यामध्ये जमीन तापते, त्यामुळे साप हे बिळातून बाहेर पडतात. साप हे थंड रक्ताचे प्राणी असतात त्यामुळे ते आपलं तापमान नियंत्रित करू शकत नाहीत. अशावेळी ते निवाऱ्यासाठी थंड आणि अंधाऱ्या जागेचा शोध घेत असतात. सापांचा हा शोध सुरू असतानाच ते तुमच्या घरात घुसण्याची देखील शक्यता वाढते. त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये तुम्हाला अनेकदा आपल्या घरात किंवा परिसरामध्ये साप आल्याचं पहायला मिळतं. या काळात सर्पदंशाच्या घटना देखील वाढतात.  अशावेळी काळजी घेणं गरजेचं असतं. तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला मारू नका, त्याची माहिती तुमच्या जवळच्या सर्पमित्रांना द्या, ते सापांना रेस्क्यू करतील, तसेच त्यांना पकडण्याचा देखील प्रयत्न करू नका, ते तुमच्या जीवावर बेतू शकतं.

आज आपण अशा काही झाडांची माहिती जाणून  घेणार आहोत, जी झाडं सापांना घरात घुसण्यास प्रतिबंध करतात, या झाडांमध्ये असे काही विशिष्ट गुणधर्म असतात, त्यामुळे साप घरात येत नाहीत. तुम्ही जर कधी आदिवासी पाड्यांमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला ही झाडं पहायला मिळतात. साप घरात येऊ नये, म्हणून ही झाडं लावली जातात.

वेखंड – वेखंड हे एक छोटसं झाड आहे. मात्र याच्या विशिष्ट गुणधर्मामुळे साप हे झाडं जिथे असेल तेवढ्या परिसरात कुठे आसपास देखील फिरकत नाही.

रान तुळस – रान तुळशीला तीव्र वास असतो, ही तुळस आपण घरी लावतो, त्या तुळशीपेक्षा थोडी वेगळी असते, तसेच तिच्या पानाची रचना देखील वेगळी असते.  या तुळशीची पानं लांब असतात. तसेच ही तुळस उंच वाढते. मात्र या तुळशीच्या पानांना जो तीव्र वास असतो, त्यामुळे साप घरात येत नाहीत.

सर्पगंधा – सर्पगंधा ही वनस्पती देखील सापांवर रामबाण उपाय आहे, जिथे सर्पगंधा वनस्पती असते तिथे साप येत नाहीत.

अफुमारी – अफुमारी हा एक विशिष्ट प्रकारचा वेल आहे, याचे अनेक आयुर्वेदिक उपयोग देखील आहेत. याच्या विशिष्ट गुणधर्मामुळे आणि वासामुळे साप घरात प्रवेश करत नाहीत.

मोह – मोह वृक्षाच्या सालीला विशिष्ट वास असतो, जर या झाडाची साल घरात ठेवली तर साप घरात प्रवेश करत नाहीत, असं म्हटलं जातं.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • असा डाऊनफॉल कधीच येऊ नये..; ‘आशिकी’ फेम राहुल रॉयची रील पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का
  • Tamil Nadu Exit Poll 2026 : तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये मोठी उलटफेर? स्टॅलिन नव्हे हा नेता हवाय मुख्यमंत्री, पण…
  • ठो ठो आवाजाने कुर्ला हादरलं.. ऐन वर्दळीच्या ठिकाणी रात्री गोळीबार, प्रचंड घबराट, एकजण…
  • MI vs SRH : 6 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्सची टीम प्लेऑफ मध्ये पोहोचू शकते का? हो, कसं ते समजून घ्या
  • भारतात हाहाकार! मित्र देशानेच जम्मू काश्मीर दाखवला थेट पाकिस्तानचा भाग, पाठित खंजीर खुपसत..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in