• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ठो ठो आवाजाने कुर्ला हादरलं.. ऐन वर्दळीच्या ठिकाणी रात्री गोळीबार, प्रचंड घबराट, एकजण…

April 30, 2026 by admin Leave a Comment


कुर्ला… मुंबईतील इतर शहरांप्रमाणेच हेह गजबजलेलं शहर. मात्र बुधवारी रात्री तिथे अचानक अशी अघटित घटना घडली की परिसरातील सगळेच नागरिक घाबरले, हैराण झाले आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. कुर्ला पश्चिम येथील हलाव पुलाजवळ बुधवारी रात्री एका इसमावर गोळीबार करण्यात आला आणि एकच गदारोळ माजला. बाबा एलप्पा पवार नावाच्या इसमावर गोळीबार झाला असून तो गंभीर जखमी झाल्याचे समजते. त्याला उपचारांसाठी कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्याच्यावर उपचार असून त्यांची प्रकृती मात्र ” क्रिटिकल ” असल्याची माहिती समोर आली आहे.

रात्रीच्या सुमारास गोळीबार 

बुधवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. तपासासाठी फॉरेन्सिक टीमने पचनामा करून सॅम्पल्स घेतले असून पुढील तपासासाठी ते पाठवण्यात आलं आहे. स्थानिक डीसीपी आणि इतर पोलीस टीम रात्री उशिरा घटनास्थळी आणि रुग्णालयात होती. या घटनेसंदर्भात कुर्ल्याच्या वी बी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी व्यक्ती बाबा पवार याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे त्याच्यावर जो गोळीबार झाला तो आपापसातील वादामुळ झाला की हे गँगवॉर आहे, या अनुषंगाने पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच गोळीबारासंबंधी पोलिसांनी दोन व्यक्तींना, दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे, गोळीबार का करण्यात आला याचा पोलिस लवकरच छडा लावतीलं असं सांगण्यात आलं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • NCP | सस्पेन्स संपला! राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब, चर्चांना पूर्णविराम
  • नाईलाच होता, पुन्हा असं करणार नाही..; ‘आशिकी’ फेम राहुल रॉयची कबुली, नेमकं काय घडलं?
  • Phalodi Satta Bazar : पश्चिम बंगालमध्ये फलौदी सट्टा बाजाराचा कौल कोणाच्या बाजूने? निवडणुकीचे अचूक आकडे ही या सट्टा बाजाराची खासियत
  • Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी उमेदवार देण्याचा काँग्रेसचा मोठा निर्णय, कोणाला बसणार फटका?
  • ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये मोठा ट्विस्ट, समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणारी ‘ती’ कोण? लोकप्रिय अभिनेत्रीची एण्ट्री

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in