• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Phalodi Satta Bazar : पश्चिम बंगालमध्ये फलौदी सट्टा बाजाराचा कौल कोणाच्या बाजूने? निवडणुकीचे अचूक आकडे ही या सट्टा बाजाराची खासियत

April 30, 2026 by admin Leave a Comment


पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पूर्ण झालं. आता येत्या 4 मे रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान झालं. 23 एप्रिल आणि 29 एप्रिल. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या पाच राज्यांसाठी विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. यात सगळ्यांच लक्ष आहे ते पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालाकडे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची तृणमुल काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना आहे. बंगालची निवडणूक ममतादीदी आणि भाजप दोघांसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. भाजपने पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी पुन्हा एकदा आपली पूर्ण ताकद झोकून दिली. त्याचवेळी ममता बॅनर्जी या सुद्धा त्याचं त्वेषाने लढल्या. त्यामुळे पश्चिम बंगालची निवडणूक देशभरात चर्चेचा विषय ठरली.

पश्चिम बंगालमध्ये मागच्या 15 वर्षांपासून ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसची सत्ता आहे. भाजपसमोर ही सत्ता उलथवून टाकण्याचं मोठं आव्हान आहे. भाजपकडे उत्तरेतला पक्ष म्हणून पाहिलं जातं, पश्चिम बंगाल भाषा, संस्कृतीच्या दृष्टीने थोडं वेगळं राज्य आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करणं भाजपसाठी सुद्धा चॅलेंजिंग आहे. काल मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे आले आहेत. यात पीपल्स पल्स आणि जनमत पोल या एक्झिट पोल्सनी भाजपला धक्का दिला आहे. त्यांनी तृणमुलची सत्ता येईल असे संकेत दिले आहेत. बाकी अन्य बहुतांश एक्झिट पोल्सनी बिहारमध्ये भाजपचं सरकार येईल, सत्ता परिवर्तन होईल असं म्हटलं आहे.

फलोदी सट्टा बाजाराचे आकडे अचूक मानले जातात

भारतात निवडणुकीत एक्झिट पोलच्या आकड्यांवरुन जसे आडाखे बांधले जातात, तसंच सट्टा बाजाराच्या अंदाजाकडे सुद्धा अनेकांचं लक्ष असतं. यात फलोदी सट्टा बाजाराचे आकडे अचूक मानले जातात. अनेक वर्षांपासून फलोदी सट्टा बाजार निवडणुकी संदर्भात अंदाज वर्तवत आला आहे. बऱ्याच प्रमाणात हे आकडे मूळ निकालाशी मिळते-जुळते असतात. बंगाल विधानसभा निवडणुकी संदर्भात फलोदी सट्टाबाजाराचे आकडे समोर आले आहेत.

फलोदी सट्टा बाजाराचा कल काय?

निवडणुकीआधी पश्चिम बंगालमध्ये फलोदी सट्टा बाजाराने TMC ला कौल दिला होता. पण दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर फलोदी सट्टा बाजाराने भारतीय जनता पार्टी 150 ते 152 जागा आणि टीएमसी 137 ते 140 जागा जिंकेल असा अंदाज वर्तवला आहे. या सट्टा बाजाराने सुद्धा भाजपला आघाडी दाखवली आहे. आधी त्यांनी भाजपला 100 जागा दिल्या होत्या. पण दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर त्यांनी भाजपच्या पारड्यात 150 जागा दाखवल्या आहेत. मतमोजणीच्या तारखेपर्यंत हा आकडा वर-खाली होऊ शकतो.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एकनाथ शिंदे यांच्याकडून दुसऱ्या जागेसाठी नीलम गोऱ्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब, नेमकं कारण काय?
  • 90च्या दशकातील त्या अभिनेत्रीचे मिसाइलवर नाव, थेट पाकिस्तानवर डागलली, आजही व्हिडीओ होतात व्हायरल
  • Operation Sindoor : आता वर्षभरानंतर राजनाथ सिंह यांच्याकडून ऑपरेशन सिंदूरबद्दल मोठं सिक्रेट उघडं
  • सावधान! ऊसाचा रस पित आहात? डॉक्टरांचा थेट मोठा इशारा, आरोग्यावर अत्यंत घातक..
  • Congress: महाविकास आघाडीत काँग्रेसचा बॉम्ब, उमेदवारीवरून सस्पेन्स वाढला, त्या एका अटीने अडचणीत ठाकरे सेना?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in