• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सावधान! ऊसाचा रस पित आहात? डॉक्टरांचा थेट मोठा इशारा, आरोग्यावर अत्यंत घातक..

April 30, 2026 by admin Leave a Comment


उन्हाळा म्हटले की, थंडगार ऊसाचा रस सर्वांना दिसतो. विशेष म्हणजे उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला मोठ्या संख्येने ऊसाच्या रसाचे दुकान असतात. अशावेळी आपण चालत चालत आरामात ऊसाचा रस पिऊ शकतो. ऊसाचा रस पिल्याने शरीर थंड होते. बरेच लोक उन्हाळ्यात ऊसाचा रस अधिक पितात. मात्र, उन्हापासून बचाव करण्याकरिता तुम्ही पित असलेला हा ऊसाचा रस आरोग्यासाठी धोकादायक सिद्ध होऊ शकतो. जर तुम्ही जास्त प्रमाणात ऊसाचा रस पित असाल तर थेट आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. गॅस्टोएंटेरोलॉजिस्ट तज्ज्ञ डॉक्टर मुकेश नंदाल यांनी लाईव्ह हिंदूस्थानला बोलताना म्हटले की, ऊसाचा रस शरीरात लगेचच एनर्जी देतो. पण ऊसाचा रस पिण्याचे काही गंभीर परिणाम देखील शरीरावर होतात. मुळात म्हणजे ऊसाच्या रसात नैसर्गिक साखर अत्यंत मोठ्या प्रमाणात असते.

ज्यामुळे शरीरातील फायबर झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे शुगर लवकर ब्लडमध्ये पोहोचू शकते. ज्यामुळे ब्लड शुगर वाढू शकते. मधुमेहाची समस्या असलेल्यासाठी हे धोकादायक आहे. जास्त प्रमाणात ऊसाचा रस पिल्याने फॅटी लिव्हरवर परिणाम होऊ शकतो. यासोबतच वजनही वाढण्याची शक्यता निर्माण होते.

मधुमेही, फॅटी लिव्हरची समस्या असलेल्या लोकांनी ऊसाचा रस पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच ऊसाचा रस पिण्यापूर्वी तुम्ही कोणत्याही सेंटरवर ज्यूस पित असाल तर तेथील स्वच्छता पाहा. असे नाही की, ऊसाचा रस आरोग्यासाठी धोकादायक आहे. पण तो नक्की किती पिला पाहिजे, यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.

मुंबईमध्ये बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी अंत झाला. ज्यानंतर लोकांनी कलिंगडावरच बहिष्कार टाकला. त्यामध्येच आता ऊसाच्या रसाबद्दल तज्ज्ञांनी मोठा इशारा दिल्याचे बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे अनेक जण भर उन्हात ऊसाचा रस पितात, जे आरोग्यासाठी धोकादायक आहे. आपण जर ऊसाचा रस दररोज पित असाल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला हवा.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Buddha Purnima 2026 : गौतम बुद्ध यांचा विवाह ते ज्ञानप्राप्ती, वाचा त्यांच्या आयुष्यातील कुणालाही माहिती नसलेल्या गोष्टी!
  • शौचालय, बाथरुम ते रेडिओ लॅपटॉप, तुम्हाला जनगणनेत विचारले जाणार हे प्रश्न; अगोदरच समजून घ्या प्रक्रिया!
  • या अभिनेत्रीने 20 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत केलेला रोमान्स, तिच्यावर झालेले डबल मिनिंगचे आरोप
  • विमान प्रवासात जर तुम्ही तुमचा मोबाईल एरोप्लेन मोडवर ठेवण्यास विसरलात तर काय होईल? खरच प्लेन क्रॅश होतं का?
  • कोल्ड ड्रिंकसोबत चिप्स खाताय? होऊ शकतो मोठा परिणाम, पहिले हे वाचा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in