• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विमान प्रवासात जर तुम्ही तुमचा मोबाईल एरोप्लेन मोडवर ठेवण्यास विसरलात तर काय होईल? खरच प्लेन क्रॅश होतं का?

April 30, 2026 by admin Leave a Comment


तुम्ही अनेकदा विमानाने प्रवास केला असेल, जेव्हा तुमचं विमान टेक -ऑफ करणार असतं, त्यापूर्वी दोन मिनिटं आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलचा एरोप्लेन मोड ऑन करण्याच्या सूचना दिल्या जातात. सूचना मिळताच सर्वजण आपल्या मोबाईलचा एरोप्लेन मोड ऑन करतात. परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की विमान टेक ऑफ होण्याच्या आधी मोबाईलचा एरोप्लेन मोड का ऑन केला जातो? त्यामागे अनेक कारणं आहेत. काही जण तर असाही विचार करतात की जर समजा आपण मोबाईलचा एरोप्लेन मोड ऑन नाही केला तर आपल्या एका मोबाईलमुळे काय फरक पडू शकतो? मात्र त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची देखील शक्यता असते.

जर समजा विमान प्रवासामध्ये चुकून तुम्ही तुमच्या मोबाईलचा एरोप्लेन मोड ऑन करायचं विसरून गेलात तर विमान क्रॅश होऊ शकतं का? असाही प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? चला तर मग आधी जाणून घेऊयात की विमान टेक ऑफ होण्यापूर्वी मोबाईचा एरोप्लेन मोड का ऑन केला जातो? त्यामागे नेमकं काय लॉजिक आहे?

विमानाचं उड्डाण हे पूर्णपणे रेडिओ कम्युनिकेशन्स आणि नॅव्हिगेशन सिस्टमवर अवलंबून असतं. पायलट जेव्हा विमानाचं उड्डाण करतो तेव्हा तो पुढील प्रवासाच्या मार्गासाठी आणि सिग्नलसाठी जमिनीवर असलेल्या ट्रॅफिक कंट्रोलसोबत सातत्याने संर्पकात असतो. ट्रॅफिक कंट्रोलकडूनच त्यांना विमान किती उंचावर उडत आहे? विमानाच्या मार्गात काही अडथळा आहे का? तसेच बदलत्या हवामानाची माहिती मिळत असते. अशा स्थितीमध्ये जर तुमचा मोबाईल ऑन असेल तर विमानाकडून पाठवल्या जाणाऱ्या आणि ट्राफिक एअर कंट्रोलकडून रिसिव्ह होणाऱ्या सिग्नलमध्ये अडथळा निर्माण होतो. तुमच्या मोबाईलमधून निघणारे सिग्नल हे विमान आणि एअर ट्राफिकच्या सिग्नलमध्ये अडथळा निर्माण करतात, त्यामुळे पायलटला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जर समजा तुम्ही चुकून तुमचा मोबाईल फोन एरोप्लेन मोडवर टाकण्याचं विसरून गेले तर त्यामुळे लगेच विमान कोसळणार नाही, परंतु पायलटला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : तुम्ही देखील रात्रीच्या वेळी कपडे धुता? सावधान…, पहा वास्तुशास्त्रात काय सांगितलंय?
  • मोठी बातमी! रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीचा मुद्दा पुन्हा तापणार? राज ठाकरे आक्रमक, आता थेट केली ही मोठी मागणी
  • GT vs RCB Toss : गुजरातचा आरसीबी विरुद्ध बॉलिंगचा निर्णय, विराट प्लेइंग ईलेव्हनमध्ये की इम्पॅक्ट प्लेअर?
  • आधार कार्डसाठी UIDAI चा सर्वात मोठा निर्णय, आता नाव, पत्ता बदलायचा असेल तर…मोठी अपडेट समोर!
  • कडक खलनायिका ते प्रेमळ आत्या.. ‘नांदा सौख्य भरे’ फेम अभिनेत्रीचं कमबॅक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in