• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आधार कार्डसाठी UIDAI चा सर्वात मोठा निर्णय, आता नाव, पत्ता बदलायचा असेल तर…मोठी अपडेट समोर!

April 30, 2026 by admin Leave a Comment


आजघडीला आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही जवळजवळ कोणतेही शासकीय काम करू शकता नाही. सरकार दरबारी प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड महत्त्वाचे आहे.

परंतु आता आधार कार्ड तयार करणाऱ्या UIDAI या शासकीय संस्थेने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख बदलायची असेल तर त्यासाठी पैसे द्यावे लागतील.UIDAI च्या माहितीनुसार आधार कार्डवरील काही माहिती अपडेट करण्यासाठी कोणतीही फी द्यावी लागणार नाही.

परंतु काही विशेष दुरुस्त्या करण्यासाठी तुम्हाला मात्र पैसे खर्च करावे लागणार आहेत. सविस्तर सांगायचे झाल्यास आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल, जन्मतारीख यात बदल करायचा असेल तर त्यासाठी 75 रुपये फी च्या रुपात मोजावे लागणार आहेत.

तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील फिंगरप्रिंट, आयरीस फोटो अपडेट करायचे असेल तर त्यासाठी 125 रुपये फी द्यावी लागेल. वयाची पाच ते 17 वर्षांपर्यंत Mandatory Biometric Update करण्यासाठी फी द्यावी लागत नाही. परंतु त्यानंतर तुम्हाला ठरवून दिलेल्या नियमानुसार फी द्यावी लागते.

आधारशी संबंधित डॉक्यूमेंट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अपडेट करायचे असेल तर आणि myAadhaar पोर्टलच्या मदतीने तुम्ही हे करत असाल तर तुम्हाला 30 सप्टेंबर 2026 पर्यंत फी द्यावी लागणार नाही. आधार कार्डवरील तुम्हाला तुमचे डॉक्यूमेंट अपडेट करायचे असतेल तर त्यासाठी myAadhaar या पोर्टलचा वापर करू शकता. तुमच्या आधार कार्डमध्ये बदल करण्यासाठी UIDAI चे अधिकृत संकेतस्थळ, अॅप याचाच वापर करायला हवा.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • गोव्यात गेल्यानंतर लोकांना दारूची नशा का चढत नाही? तज्ज्ञांनी सांगितलं खूपच शॉकिंग कारण, तुम्हालाही माहिती हवं
  • IPL 2026: वैभव सूर्यवंशीसोबत घेतलेला पंगा पडला महागात, काईल जेमिसनवर बीसीसीआयची थेट कारवाई
  • Team India : टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा, कॅप्टन कोण?
  • Bachchu Kadu | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले….
  • RR vs DC: मी घाबरलो होतो…! वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतर काईल जेमिसनची सामन्यानंतर जाहीर कबुली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in