• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीचा मुद्दा पुन्हा तापणार? राज ठाकरे आक्रमक, आता थेट केली ही मोठी मागणी

April 30, 2026 by admin Leave a Comment


पुण्यातील टिळक स्मारक मंदिर सभागृहात वसंत व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे.  या कार्यक्रमात ‘माझ्या मनातला महाराष्ट्र, मराठी अस्मिता’ या विषयावर आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं व्याख्यान पार पडलं. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवरून  सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा आलीच पाहिजे अशी भूमिका सरकारने घेतली होती. सरकारच्या या मराठी सक्तीच्या धोरणाला टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी विरोध केला. सरकारच्या या  भूमिकेविरोधात एक मे पासून संपावर जाण्याचा इशारा रिक्षा चालक संघटनांकडून देण्यात आला होता. यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. अखेर सरकारने माघार घेतली, मराठी भाषेची सक्ती असेल परंतु 15 ऑगस्टपर्यंत कारवाई होणार नाही, असा तोडगा यावर सरकारने काढला. तसेच रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा देखील शिकवली जाणार आहे. यावरून राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मोठी मागणी केली आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? 

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा रिक्षा चालकांना मराठी सक्तीच्या विषयावर बोलताना रिक्षा आणि टॅक्सी चालकांना चांगलंच फटकारलं आहे.  आम्ही मराठी बोलणार नाही, असं म्हणण्याची यांची हिंमतच कशी होते? आपले मंत्री त्यांना मराठी शिकायला वेळ देतात. बाकीच्या राज्यात असं होत नाही, तुम्ही गुजरातमध्ये जाऊन बघा, तामिळनाडूमध्ये जाऊन बघा असं होत नाही. यांची लायन्स रद्द करा अशी मागणी यावेळी राज ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान पुढे बोलताना राज ठाकरे यांनी असं देखील म्हटलं की, सध्या आम्ही जातीपातीच्या राजकारणामध्ये सापडलो आहोत. आम्हीच आमच्या महापुरुषांना जातीपातीमध्ये विभागले आहे.  लेखक कोण आणि कवी कोण त्यांची देखील जात पाहिले जाते, जात पाहून पुस्तक विकत घेतलं जातं. त्यांना फक्त वाद पेटवायचा आहे, यातून आपण बाहेर पडलं पाहिजे, अशी असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हलटं आहे.

 

 

 

 

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : समस्या कितीही मोठी असू द्या, संकट काळात या गोष्टी करा, तुमचा पराभव कोणीच करू शकणार नाही
  • कीलेस इग्निशन म्हणजे काय? दुचाकी चावीशिवाय कशी स्टार्ट होते? जाणून घ्या सविस्तर
  • इंदुरीकर पुन्हा चर्चेत, ज्या बाबाच्या पाया पडले त्यालाच पोलिसांनी उचललं, निवृत्ती महाराजांचा हा Video तुम्ही पाहिलात का?
  • Gautam Buddha Quotes: ‘तीन गोष्टी जास्त काळ लपू शकत नाहीत – सुर्य, चंद्र आणि सत्य’, बुद्धांचे महत्वाचे विचार वाचा…
  • एकाच झटक्यात तब्बल 90 राजीनामे, राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का; राजकारणात खळबळ!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in