• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इंदुरीकर पुन्हा चर्चेत, ज्या बाबाच्या पाया पडले त्यालाच पोलिसांनी उचललं, निवृत्ती महाराजांचा हा Video तुम्ही पाहिलात का?

April 30, 2026 by admin Leave a Comment


इंदुरीकर महाराज हे आपल्या कीर्तनासाठी राज्यभरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कीर्तनाला भाविकांची मोठी गर्दी होते. कीर्तनातून समाज प्रभोधन करण्यासाठी इंदुरीकर महाराज ओळखले जातात. मात्र इंदुरीकर महाराज हे कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. निवृत्ती महाराज देशमुख यांनी आपल्या कीर्तनामध्ये महिलांसंदर्भात जी वक्तव्य केली त्यावर देखील अनेकदा आक्षेप घेण्यात आला, त्यामुळे देखील इंदुरीकर महाराज चांगलेच चर्चेत आले होते. तसेच इंदुरीकर महाराज हे आपल्या कीर्तनात लोकांना नेहमी सल्ला देतात की मुला, मुलींचे लग्न साधेपणाने करा, जास्त खर्च करू नका. मात्र त्यांनी आपल्या मुलीच्या साखर पुड्यात जो खर्च केला त्यावरून देखील त्यांच्यावर टीका झाली होती.

महाराज नेहमी लोकांना सल्ला देतात की आपल्या मुला मुलींचे लग्न साधपणाने करा, मग त्यांनी आपल्या मुलीच्या साखर पुड्यात एवढा खर्च कसा केला असा प्रश्नही तेव्हा अनेकांनी उपस्थित केला होता. दरम्यान आता पुन्हा एकदा इंदुरीकर महाराज चर्चेत आले आहेत. त्याला कारण देखील तसंच आहे,  काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केलेल्या मनोहर मामा भोसले या बाबासोबतचा त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये इंदुरीकर महाराज या बाबाच्या पाया पडताना दिसत आहेत.  त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

मनोहर मामा भोसलेवर नेमके काय आहेत आरोप? 

मनोहर मामा भोसले स्वत:ला आपण बाळुमामाचा आवतार असल्याचं सांगतो. बुआबाजी प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. सोलापूरातील रिअल इस्टेट एजंट असलेले गौतम कसबे यांच्याकडून विधीवत पूजेसाठी भोंदू मनोहर भोसले याने 50 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली आहे, त्याचे आणखी ही काही कारनामे समोर आले आहेत. दरम्यान मनोहर मामा भोसले याच्यासोबत आता इंदुरीकर महाराजांचा एक व्हिडीओ समोर आल्यानं महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.  हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी; पाचोरा येथे फळ विक्रेता चक्कर येऊन कोसळला
  • विधान परिषद उमेदवारीनंतर ठाकरे गटात खळबळ; एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत
  • डिफेंडर निघाली सदोष, ग्राहकाचा मोठा विजय, कोर्टाचा जेएलआर इंडियाला 1.65 कोटी परत करण्याचा आदेश
  • Virar | थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावरच…
  • अनोखा ‘दशरथ मांझी’; ६७ वर्षांच्या नानांनी एकट्याने डोंगर फोडून बनवला रस्ता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in