• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अनोखा ‘दशरथ मांझी’; ६७ वर्षांच्या नानांनी एकट्याने डोंगर फोडून बनवला रस्ता

April 30, 2026 by admin Leave a Comment


प्रयत्ने वाळुचे कण रगडीता तेलही गळे…असे उगाच म्हटले जात नाही.माणसाची जिद्द असेल तर कोणतेही अवघड शिवधनुष्य पेलता येते. याचा प्रत्यय साताऱ्यात आला आहे. येथील करंडी गावचे ६७ वर्षी अशोक जाधव उर्फ नाना यांनी अचाट कामगिरी केली आहे.

अशोक जाधव उर्फ नाना यांनी येथील श्री सिलोबा गडावरील खडतर वाट त्यांनी आपल्या श्रमातून ३.५ किलोमीटरच्या सुटसुटीत रस्त्यात रूपांतरित केली आहे. या गावातील या डोंगरावरील मंदिरातील वाट आधी अवघड होती.

श्री सिलोबा गड हे या भागातील महत्त्वाचे श्रद्धास्थान मात्र गडावर जाण्यासाठी पूर्वी अत्यंत अरुंद घसरडी आणि जीवघेणी पायवाट होती. वयोवृद्ध, महिला भाविकांना तिथे जाणे अशक्य व्हायचे.

ही अडचण पाहून अशोक जाधव यांनी कुणाचीही मदत न घेता हा रस्ता तयार करण्याचा ध्यास घेतला.सुरुवातीला गावातील मुलेही त्यांना मदत करायची.नंतर त्यांनी नेमाने रोज येथील गवत काढले आणि तीन चार फुटांचा रस्ताही तयार केला.

अशोक जाधव स्वत:सोबत पाणी न्यायचे आणि पाणी संपेपर्यंत काम करायचे आणि पाणी संपले की घरी यायचे. अशा प्रकारे चार वर्षांच्या मेहनतीनंतर हा रस्ता आता पूर्ण झाला आहे.यंदाच्या जत्रेला या वाटेमुळे महिलाही देवाच्या दर्शनाला आल्या होत्या. त्यामुळे अशोक जाधव यांचे गावातील ग्रामस्थांसह परिसरात चांगलेच कौतुक आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी; पाचोरा येथे फळ विक्रेता चक्कर येऊन कोसळला
  • विधान परिषद उमेदवारीनंतर ठाकरे गटात खळबळ; एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत
  • डिफेंडर निघाली सदोष, ग्राहकाचा मोठा विजय, कोर्टाचा जेएलआर इंडियाला 1.65 कोटी परत करण्याचा आदेश
  • Virar | थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावरच…
  • अनोखा ‘दशरथ मांझी’; ६७ वर्षांच्या नानांनी एकट्याने डोंगर फोडून बनवला रस्ता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in