• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारतात हाहाकार! मित्र देशानेच जम्मू काश्मीर दाखवला थेट पाकिस्तानचा भाग, पाठित खंजीर खुपसत..

April 30, 2026 by admin Leave a Comment


भारत नेपाळला कायमच जवळचा मित्र देश म्हणून बघतो. मात्र, आता नेपाळकडून असे काही करण्यात आले की, त्यांना मित्र म्हणण्याचीही लाज वाटत आहे. भारताने ज्याचा विचारही केला नाही, असे घाणेरडे काम नेपाळने केले. नेपाळच्या या पावलामुळे भारतीयांमध्ये प्रचंड मोठा संताप आहे. हेच नाही तर यामुळे भारत आणि नेपाळ यांच्या संबंधांवर थेटपणे परिणाम झाला. नेपाळ एअरलाइन्सने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या विमान वाहतूक जाळ्याचा एक नकाशा शेअर केला. ज्यात त्यांनी चक्क पूर्ण जम्मू काश्मीर आणि लदाख चक्क पाकिस्तानचा भाग म्हणून दाखवले. ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. मोठ्या संख्येने वापरकर्त्यांनी याला भारतीय सार्वभौमत्वाचा अपमान म्हटले. भारतीयांनी संताप व्यक्त केला. नेपाळ एअरलाइनवर दबाव वाढला, भारताने थेट कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर नेपाळ एअरलाइने अखेर सोशल मीडियावरून ती वादग्रस्त पोस्ट हटवण्याचा निर्णय घेतला.

नेपाळ एअरलाइनने ती पोस्ट हटवली. मात्र, इतक्या मोठ्या चुकीबद्दल त्यांनी कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण लगेचच दिले नाही. त्यांनी थोड्यावेळापूर्वी एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करत खेद व्यक्त केला. मात्र, चुकीला माफी नसल्याचे भारतीयांकडून सांगितले जात आहे. जागतिक पातळीवर भारत आता नेपाळविरोधात भूमिका घेण्याचे संकेत आहेत.

Nepal Airlines is facing heavy backlash

मोठ्या वादानंतर नेपाळ एअरलाइनने म्हटले की, सोशल मिडिया चॅनलवर आम्ही नुकताच एक मॅप शेअर केला. तिथे चुकून एक मोठी चूक झाली. त्याकरिता आम्ही मनातून माफी मागू इच्छितो. यासोबतच त्यांनी म्हटले की, ही चूक आमच्या लक्षात येताच आम्ही तात्काळ पोस्ट हटवली. आम्ही आमच्या शेजारच्या देशासोबत मजबूत नाते ठेवण्याकरिता कायमच प्रयत्न करतो. जर आमच्या पोस्टने त्यांचे मन दुखले असेल तर आम्ही मनातून माफी मागतो.

We sincerely apologize for error in the network map recently shared on our social media channels. The map contained significant cartographic inaccuracies regarding international boundaries that do not reflect the official stance of Nepal or Nepal Airlines. pic.twitter.com/E5MZSS8CjQ

— Nepal Airlines🇳🇵 (@NepalAirlinesRA) April 30, 2026

नेपाळ एअरलाइनच्या चुकीनंतर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला. नेपाळ एअरलाइनने माफी मागतिली, तरीही लोकांचा राग काही कमी होत नाहीये. जम्मू काश्मीर आणि लदाख भारताचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. नेपाळ एअरलाइन ते पाकिस्तानचे दाखवण्याची हिमत कशी करू शकते कशी ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सरकारकडूनही नेपाळवर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘या’ 5 पदार्थांच्या सेवनाने किडनी स्टोनचा त्रास अधिक वाढतो, जाणून घ्या
  • Todays Gold Rate: पुन्हा सोन्याच्या भावात वाढ! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी…
  • Vaibhav Sooryavanshi : वैभव मुंबई इंडियन्सकडून खेळू शकतो, दिग्गज क्रिकेटरने राजस्थान रॉयल्सला कटू सत्याची जाणीव करुन दिली
  • पहेलवानही पाहता क्षणी जोडतो हात…रेल्वेच्या चाकाचं वजन माहिती आहे का? इतक्या किलोचं चाकं उचलताना अनेकांची हवा टाईट
  • Drishyam 3 : रहस्यांचा अंतिम चॅप्टर, सस्पेन्सने भरलेला ‘दृश्यम 3’चा टीझर; 5 महिन्यांपूर्वीच अजय देवगणला झटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in