• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Drishyam 3 : रहस्यांचा अंतिम चॅप्टर, सस्पेन्सने भरलेला ‘दृश्यम 3’चा टीझर; 5 महिन्यांपूर्वीच अजय देवगणला झटका

April 30, 2026 by admin Leave a Comment


2026 या वर्षात आतापर्यंत अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, तर काही प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यापैकीच एक बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट म्हणजे ‘दृश्यम 3’. अजय देवगण त्याचा ‘दृश्यम 3’ हा हिंदीतील चित्रपट ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित करणार आहे. परंतु साऊथ सुपरस्टार मोहनलाल हाच चित्रपट मल्याळम भाषेत मे महिन्यात प्रदर्शित करत आहेत. या निर्णयामुळे अजयला फटका बसू शकतो. मोहनलाल यांची मुख्य भूमिका असलेल्या मल्याळम ‘दृश्यम 3’चा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भारतीय सिनेसृष्टीत सर्वोत्कृष्ट सस्पेन्स थ्रिलर फ्रँचाइजींचा विषय येतो, तेव्हा ‘दृश्यम’चा आवर्जून उल्लेख होतो. या फ्रँचाइजीने बॉलिवूडमध्येही प्रचंड यश मिळवलं आहे.

‘दृश्यम 3’च्या टीझरमध्ये मोहनलाल जॉर्ज कुट्टीच्या भूमिकेत दिसत आहे. या टीझरमध्ये मागील दोन भागांमधील दृश्ये एकत्र जोडलेली पहायला मिळत आहेत. अखेरीस जॉर्ज कुट्टी स्वत:ला आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी एक नवीन योजना आखताना दिसतोय. आपला भूतकाळ पिच्छा सोडणार नाही याची जाणीव त्याला होते आणि त्याच्या कुटुंबावर एक नवीन संकट घोंघावणार असल्याचं समजताच तो अधिक सावध होतो. हा टीझर प्रेक्षकांना खूपच आवडला असून त्यावर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.

#Drishyam3 Official Teaserhttps://t.co/vdOJ8enhTj

Worldwide Release | May 21st 2026@jeethu4ever @antonypbvr @KumarMangat @jayantilalgada @AbhishekPathakk #MeenaSagar@aashirvadcine @PanoramaMovies @PenMovies @ram_rampagepix #RavindraAuti @Rajeshmenon1969 @Abh1navMehrotra… pic.twitter.com/HmetQtapKz

— Mohanlal (@Mohanlal) April 29, 2026

पहा टीझर-

मोहनलालचा ‘दृश्यम 3’ हा येत्या 21 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट आधी 2 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु पोस्ट प्रॉडक्शनच्या कामामुळे तो पुढे ढकलण्यात आला आहे. ‘दृश्यम’ हा मल्याळम भाषेतील चित्रपट सर्वप्रथम 2013 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट जगभरात हिट झाल्यानंतर अजय देवगणने त्याचा हिंदी रिमेक बनवला. 2025 मध्ये प्रदर्शित झालेला ‘दृश्यम’चा हिंदी रिमेकसुद्धा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. त्यानंतर 2022 मध्ये ‘दृश्यम 2’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा दुसरा भागसुद्धा हिट झाला. परंतु यावेळी मोहनलाल यांनी एक पाऊल पुढे टाकत अजयचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘दृश्यम 3’ची तारीख निश्चित केली. त्यामुळे पाच महिन्यांपूर्वीच अजयला झटका बसला आहे. तसं पाहिल्यास, ‘दृश्यम’चा हिंदीतील प्रेक्षकवर्गही मोठा आहे. पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • साप आयुष्यात कधीच घरात घुसणार नाही, एका पदार्थाच्या रसामुळे लांबूनच जातो पळून!
  • आम्ही युद्धासाठी तयार… इराणची पुन्हा डरकाळी, अमेरिकेवर गंभीर आरोप; जग संकटात
  • मी नकार दिला, रडले तरीही दिग्दर्शकाने मला बिकिनी घालायला भाग पाडलं, या अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
  • गोव्यात गेल्यानंतर लोकांना दारूची नशा का चढत नाही? तज्ज्ञांनी सांगितलं खूपच शॉकिंग कारण, तुम्हालाही माहिती हवं
  • IPL 2026: वैभव सूर्यवंशीसोबत घेतलेला पंगा पडला महागात, काईल जेमिसनवर बीसीसीआयची थेट कारवाई

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in