
Railway Wheels Weight: भारतीय रेल्वेने तांत्रिक क्षेत्रात आधुनिकीकरण, विद्युतीकरम, सुरक्षा, डिजिटलीकरण आणि वेगवान वंदे भारत, बुलेट ट्रेन सारखे प्रयोग सुरू केले आहेत. भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा येत्या काही दिवसात बदलणार आहे. प्रवाशांना आरामदायक, स्वस्त आणि वेगवान प्रवासासाठी भारतीय रेल्वेने कंबर कसली आहे. भारतीय रेल्वेने गेल्या काही वर्षात अनेक विक्रम नावावर केले आहे. रेल्वे स्टेशनही आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणार आहे. त्याचवेळी रेल्वेशी संबंधित ही रंजक माहिती तुम्हाला माहिती आहे का?
रेल्वेची चाकं तयार होतात कुठं?
भारतात रेल्वेची चाकं मुख्यतः कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील रेल्वे चाक निर्मिती कारखान्यात (Rail Wheel Factory – RWF) तयार होते. इथे चाक, धुरी आणि संपूर्ण व्हील सेट तयार करण्यात येतो आणि बिहारमधील सारण जिल्ह्यातील बेला येथील रेल्वे चाक प्रकल्पात (RWP) ही चाकं तयार करण्यात येतात. येथे मोठ्या प्रमाणात चाक निर्मिती करण्यात येते. याशिवाय तामिळनाडू राज्यातही नवीन कारखाना लवकरच सुरू करण्यात येणार आहे. भारत रेल्वेची चाक निर्मितीच नाही तर निर्यातदार म्हणूनही जगाच्या नकाशावर लवकरच येणार आहे.
भारत होणार चाकं निर्यातदार
भारतीय रेल्वे, विकासाच्या रुळावरून वेगाने धावत आहे. तामिळनाडू येथील गुम्मिदीपोंडी येथे फोर्ज्ड चाक उत्पादनासाठी एक नवीन कारखाना उभारल्या जात आहे. त्यामुळे भारत हा फोर्ज्ड चाक उत्पादनातील आघाडी घेईल. उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे खासगी आणि सरकारी क्षेत्रातील कारखाने हे पोलादाचा पुरवठा करण्यासोबतच गतिमान रेल्वेसाठी चाकं तयार करण्याचे कामही करत आहे. त्यामुळे चाकं आयात न होता त्यांची निर्यात होणार आहे. भारतात वंदे भारतासह इतर जलद रेल्वेसाठी चाकाचं उत्पादन सुरू झालं आहे. जागतिक बाजारात भारत ही मोठा निर्यातदार होणार आहे.
ट्रेनच्या चाकंच वजन किती?
ट्रेनच्या चाकाचं वजन किती हे त्याचा वापर आणि रेल्वेचा प्रकार यावर अवलंबून आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडनुसार, ट्रेनच्या चाकाचं वजन 326 किलोग्रॅम (LHB कोच) तर 554 किलोग्रॅम (इलेक्ट्रिक इंजिन) पर्यंत असू शकते. तर सामान्य कोचच्या चाकचं वजन जवळपास 384 किलो आणि डिझेल इंजिनच्या चाकचं वजन 528 किलो इतके असू शकते.
डिस्क्लेमर: सदर माहिती ही विविध अहवालांमधील दाव्यांवर आधारीत आहे. टीव्ही 9 मराठी कोणताही दावा करत नाही.
Leave a Reply