• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विधानपरिषदेचे तिकीट मिळताच अंबादास दानवेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, उद्धव ठाकरेंनी…

April 29, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र आता या सर्व चर्चा केवळ फेक असल्याचे समोर आले आहे. आदित्य ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना महाविकास आघाडीचे तिकिट देण्यात आले असल्याची माहिती दिली. त्यानंतर अंबादास दानवे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

दानवेंची पहिली प्रतिक्रिया काय?

विधानपरिषदेचे तिकिट मिळाल्यानंतर अंबादास दानवे यांनी आनंद व्यक्त केले आहे. ते म्हणाले, माझी पहिली प्रतिक्रिया, उद्धव जींनी सभागृहात जावं अशी आमच्या सगळ्या नेत्यांची भूमिका होती. पण त्यांनी एका सामान्य शिवसैनिकाला पुन्हा सभागृहात जाण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मला वाटते. निश्चित मी उद्धव जींचा, पक्षाचा आणि शिवसेना प्रमुखांच्या विचाराने चालण्याचा आम्ही जो संकल्प केला मला असे वाटते त्याच विचाराचा हा विजय आहे. निष्ठा तर ठेवली पाहिजे. फळ म्हणायला गेलो तर ह्याच्या आधीही मी सभागृहात होतो. विरोधी पक्ष नेता होतो. निष्ठा तर ठेवली पाहिजे. परंतू सामान्य शिवसैनिकाला उद्धवजींनी त्यांची जागा दिली हे सगळ्यात महत्त्वाचे आहे.

उद्धव ठाकरेंचे मानले आभार

माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे पुढे म्हणाले की, मी उद्धव साहेबांचे आभार मानतो. आणि पक्षाने, शिवसेना प्रमुख्यांच्या आशिर्वादाने मला जबाबदारी दिलेली आहे. मी ऑलरेडी सभागृहात होतो. एक गॅपकेबाद, एका ब्रेकनंतर पुन्हा येतोय. उद्धव ठाकरे पुन्हा सभागृहात येतील या चर्चेवर बोलताना दानवे म्हणाले की, मला असं वाटतं उद्धवजींनी एका शिवसैनिकाला सभागृहात जाण्याची पुन्हा एकदा संधी दिली आहे. आमच्या सगळ्यांची भूमिका होता की ठाकरे साहेबांनी सभागृहात यावं. मला असे वाटते उद्धवसाहेबांनी सगळ्या नेत्यांशी चर्चा करुन उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपचे उमेदवार कोण?

भाजपाने यावेळी माधवी नाईक, सुनिल कर्जतकर, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. तर विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • West Bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये वारं फिरलं, ममता बॅनर्जींना मोठा धक्का, भाजपची जोरदार मुसंडी
  • Tamil Nadu Exit Poll | तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK पुन्हा सत्तेत, भाजप-AIADMK पिछाडीवर
  • रोहित शर्मा आयपीएल 2026 स्पर्धेला मुकणार? नाणेफेकीचा कौल होताच हार्दिक पांड्याने दिले अपडेट
  • Keral Exit Poll | चार राज्यांच्या निकालाआधीच एक्झिट पोलचा मोठा अंदाज, केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
  • भाजपला घवघवीत यश! 5 पैकी 3 राज्यांमध्ये कमळ फुलणार, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in