
किचन ही अशी जागा आहे, जी नेहमी स्वच्छ असावी लागते. किचनमध्ये एकदा घाण झाली की त्यात अनेक प्रकारचे कीटक, अळ्या तयार होतात. त्यानंतर किचनमध्ये दुर्गंधी यायला लागते. किचनमध्ये उभेदेखील राहावेसे वाटत नाही.
विशेष म्हणजे किचनमध्ये एकदा का किडे, कीटक, अळ्यांनी आपले घर केले की त्यांचा बंदोबस्त करणे खूप कठीण होऊन जाते. अशाच प्रकारे किचनमध्ये एकदा का झुरळ झाले की मात्र कायमची डोकेदुखी होऊन जाते.
किचनमध्ये एकदा का झुरळ झाले की त्यापासून सुटका करून घेणे खूपच कठीण होऊन जाते. किचनमधील प्रत्येक पिशवीत, भांड्यात, डब्यात झुरळ दिसायला लागतात. विशेष म्हणजे फ्रिजमध्येही झुरळ आपले घर करून राहू शकतात.
त्यामुळे झुरळांपासून फ्रिजची सुटका करायची असेल, फ्रिजमध्ये झुरळ जाऊ नयेत यासाठी काय करावे ते जाणून घ्या. तुम्हाला बोरिक अॅसिड खूप मदतीला येऊ शकते. फ्रीजमधील सर्व सामान बाहेर काढा. त्यानंतर फ्रिजच्या प्रत्येक कोपऱ्यात बोरिक अॅसीड शिंपडावे. अध्या तासासाठी फ्रिज तसेच ठेवावे.
त्यानंतर फ्रिजला कापडाने पुसन घ्या. पाण्याने पुन्हा एकदा फ्रीज पुसून घ्यावे. त्यानंतर फ्रीजमध्ये झुरळ घुसरणार नाही. (टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)




Leave a Reply