• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फार कमी लोकांना माहितीये या 4 फळांबद्दल जे आहेत चवदार आणि असंख्य फायद्यांनी परिपूर्ण

May 27, 2026 by admin Leave a Comment


पूर्व आशियामध्ये असलेल्या देशात खाल्ली जाणारी काही फळांचे पीक भारतातही घेतले जाते, आणि हे फार कमी भारतीयांना याची माहिती आहे. कारण ही फळं दिसण्यात आणि चवीत बरीच वेगळी आहेत. ट्रॉपिकल टेस्टने परिपूर्ण असलेली ही फळे डाएटसाठी उत्तम मानली जातात. तुम्ही ही फळे कदाचित सुपरमार्केटमध्ये पाहिली असतील. जर तुम्हाला नवीन खाद्यसंस्कृतीचा शोध घ्यायला आवडत असेल किंवा तुम्ही विदेशी फळांचे चाहते असाल, तर तुम्ही ही पाच अनोखी फळे नक्कीच चाखून बघायला हवीत. मुख्यतः पूर्व आशियाई देशांमध्ये आढळणारी ही फळे भारतातील फळांपेक्षा थोडी वेगळी आहेत. अशातच या फळांपैकी एक असे फळ आहे जे हंगामी उन्हाळी फळ म्हणून लिचीसारखे दिसते. चवीत आणि पौष्टिकतेत वेगळे आहे. चला तर मग या पाच फळांबद्दल जाणून घेऊयात.

ड्युरियन फळ

पूर्व आशियाई फळांबद्दल बोलायचे झाल्यास, ड्युरियन हे थायलंडमधील एक स्थानिक फळ आहे. त्याच्या विचित्र वासामुळे ते फारसे पसंत केले जात नसले तरी, आग्नेय आशियामध्ये ड्युरियन फळाला फळांचा राजा मानले जाते. या फळामध्ये जीवनसत्त्वे आणि चांगल्या फॅटचा खजिना आहे. याची लागवड तामिळनाडू आणि केरळसारख्या दक्षिण भारतीय प्रदेशांमध्ये केली जाते. तसेच ते त्रिपुरा आणि आसामसारख्या काही ईशान्येकडील राज्यांमध्येही आढळते.

लिचीसारखे दिसणारे रामबुतान फळ

रामबुतान फळ हे भारताताचे हंगामी फळ लिचीसारखे दिसते. हे रसरशीत फळ गरयुक्त असून त्याची चव लिचीसारखीच असते. हे व्हिटॅमिन सी ने समृद्ध असून शरीराला हायड्रेट करणारे फळ मानले जाते.

लिंबासारखे दिसणारे युझू फळ

युझू फळ जे दिसायला लिंबासारखे एक पिवळे फळ आहे. जपानमध्ये पिकवले जाते. भारतात काही ठिकाणी या फळाचे पीक घेतले जाते. हे फळ तुम्हाला भारतातील सुपरमार्केटमध्ये आणि ऑनलाइन मिळेल. त्याची चव आणि सुगंध लिंबू आणि संत्र्याप्रमाणेच ताजे असतात. ते अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असून रोगप्रतिकारशक्ती आणि त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते.

स्नेक फ्रूट

हे फळ अगदी त्याच्या नावाप्रमाणेच दिसते. त्याच्या बाहेरील सालीमुळे याला ‘स्नेक फ्रूट’ म्हणतात. याची साल सापाच्या त्वचेसारखी दिसते. याचा पोत कुरकुरीत असतो आणि चव ट्रॉपिकल म्हणजेच गोड-आंबट असते. या फळात पोटॅशियम आणि कॅल्शियमसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील आढळतात. भारतात याची लागवड केरळच्या काही भागांमध्ये, विशेषतः त्रिशूर आणि एर्नाकुलममध्ये केली जाते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
  • मिलिट्री मशीनची ताकद, भारतीय सैन्याच्या वाहनांमध्ये का केले जातात खास बदल?
  • निधीवाटपावर अखेर तोडगा निघाला, महायुतीच्या बैठकीत 2 महत्त्वाचे निर्णय; महामंडळाबाबत मोठी अपडेट समोर!
  • ECG आणि ड्युअल GPS असलेल्या फिचर्ससह Pixel Watch 5 भारतात लाँच, जाणून घ्या त्याची किंमत
  • Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in