• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फक्त ‘या’ 4 घरगुती गोष्टींचा वापर करून बनवा व्हिटॅमिन सी सीरम, तुमचा चेहऱ्यावर येईल अनोखी चमक

May 26, 2026 by admin Leave a Comment


आजकाल प्रत्येकाला चमकदार त्वचा हवी असते. त्यासाठी बहुतेकजण त्वचेसाठी महागडे उपचार करतात तर काही स्किन केअर प्रोडक्ट वापरतात. तर त्वचेला योग्य पोषण द्याचे असतील तर यापैकी सर्वात लोकप्रिय म्हणजे व्हिटॅमिन सी सीरम. हे सीरम त्वचेसाठी एक वरदान मानले जाते, कारण ते केवळ त्वचेची आतून दुरुस्ती करत नाही, तर त्वचेचा निस्तेजपणा, पिगमेंटेशन आणि टॅनिंग कमी करण्यास देखील मदत करते. तुम्हाला बाजारात व्हिटॅमिन सी सीरमचे अनेक ब्रँड्स मिळतील, परंतु ते अनेकदा या सीरममध्ये केमिकलचा वापर केलेला असतो आणि हेच सीरम त्वचेला लावण्याने कालांतराने दुष्परिणाम दिसू लागतात. व्हिटॅमिन सी सीरम खूप महाग देखील असतात. त्यामुळे तुम्ही बाजारातून सी सीरम आणण्यापेक्षा ते घरी बनवणे हा एक चांगला पर्याय आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे घरगुती सीरम बनवण्यासाठी तुम्हाला बाजारातून अनेक महागडे साहित्य विकत घेण्याची गरज नाही. फक्त चार सोप्या घटकांचा वापर करून, तुम्ही एक नैसर्गिक व्हिटॅमिन सी सीरम तयार करू शकता, जे तुमच्या चेहऱ्यावर सोनेरी चमक आणण्यास मदत करेल. चला तर मग, घरी व्हिटॅमिन सी सीरम कसे बनवायचे ते जाणून घेऊयात.

घरी व्हिटॅमिन सी सीरम बनवण्यासाठी लागणारे साहित्‍य

1 चमचा कोरफड जेल

1 व्हिटॅमिन सी कॅप्सूल किंवा 1 चमचा संत्र्याच्या सालीची पावडर

1चमचा गुलाब पाणी

ग्लिसरीनचे 4-5 थेंब

सीरम बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम एक स्वच्छ वाटी घ्या. त्यात कोरफडीचा गर टाका. आता त्यात व्हिटॅमिन सी कॅप्सूलमधील पावडर मिक्स करा. तुमच्याकडे कॅप्सूल नसल्यास तुम्ही संत्र्याच्या सालीची पावडर वापरू शकता. त्यानंतर त्यात गुलाबपाणी आणि ग्लिसरीन टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. मिश्रण एकजीव झाल्यावर ते एका लहान, हवाबंद डब्यात भरून ठेवा. तुमचे घरगुती व्हिटॅमिन सी सीरम तयार आहे.

व्हिटॅमिन सी सीरम त्वचेला अशा प्रकारे लावा

झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ धुवा. सीरमचे 2 ते 3 थेंब लावा आणि चेहऱ्यावर व मानेवर हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी धुवून टाका.

व्हिटॅमिन सी सीरम लावण्याचे फायदे

हे सीरम चेहऱ्यावरील निस्तेजपणा कमी करून त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करते.

नियमित वापरामुळे पिंपल्सचे डाग आणि काळेपणा हळूहळू कमी होऊ लागतात.

कोरफड आणि ग्लिसरीन त्वचेला खोलवर आर्द्रता देऊन मऊ ठेवतात.

व्हिटॅमिन सी मध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे वृद्धत्वाचे परिणाम कमी करण्यास मदत करतात.

हे सीरम सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे होणाऱ्या त्वचेच्या नुकसानापासून संरक्षण करण्यास देखील मदत करू शकते.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आदेश बांदेकर पुन्हा दिसणार मालिकेत! प्रोमोने वेधले लक्ष, मालिकेचे नाव काय?
  • ड्रग्स माफियांचे पाय लटलटले… सलीम डोळा ताब्यात… इतक्या कोटींचे ड्रग्ज जप्त… फडणवीस सरकार ॲक्शन मोडवर
  • 6 हजारांवरून थेट 358K फॉलोअर्स; ‘इंडियाज गॉट लेटेंट’मुळे अंबरनाथचा सुकृत देव बनला स्टार; आलिया भट्टही झाली फॅन
  • Ketan Agarwal Death : भर उन्हात एक चूक आणि पकडला आरोपी.. , पोलिसांनी कसं उलडगडलं केतनच्या हत्येचं गूढ ?
  • Sushma Andhare | निधी मिळत नाही हे कारण…तर निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in