• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रताप सरनाईक यांचा चांगला निर्णय, जखमी गोविंदासाठी केली मोठी घोषणा

September 5, 2026 by admin Leave a Comment


मुंबई, ठाण्यात दहीहंडीची उंची आणि पथकांचे थर अनेकांच्या चर्चेचा विषय ठरतो. या वर्षीची दहीहंडीची जोरदार चर्चा होत आहे. यंदाही दहीहंडी उत्सवादरम्यान गोविंदा जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी गोविंदा नागेश भोईर थरावरुन कोसळून जखमी झाला होता. 2009 साली घडलेल्या या दुर्घटनेमुळे गोविंदा नागेश भोईर हा गंभीर जखमी झाला. तेव्हापासून नागेश हा अंथरुणात खितपत पडला आहे. या गोविंदा नागेशच्या उपचाराचा खर्च उचलण्याची घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

भिवंडीतील गोविंदा नागेश भोईर याचा अवघ्या 24 व्या वर्षी दहीहंडीच्या थरावरून कोसळून अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर गेली 18 वर्षे नागेश भोईर हा अंथरुणात आहे. काही दिवसांपूर्वी याच नागेशने आर्थिक मदत देण्यापेक्षा उपचारांचा खर्च शासनाने उचलण्याची मागणी केली होती.

नागेशचा भिवंडीत दहीहंडी उत्सवादरम्यान अपघात झाला होता. तो 2009 साली दहीहंडीच्या थरावर चढताना जमिनीवर कोसळला होता. या अपघात मणक्याला दुखापत झाली होती. दुर्घटनेनंतर त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु उपाचारानंतर त्याला कायमचं अपंगत्व आलं. दुर्घटनेनंतर त्याला स्वत:च्या पायावर उभे राहायला जमलेच नाही. अपघातामुळे सामान्य व्यक्तीसारखं जगण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं.

गोविंदा नागेश भोईर याने सोशल मीडियावरून दहीहंडीमधील कटू प्रसंग सांगितले होते. त्याने दहीहंडीमधील दुर्घटनेनंतर आयुष्य बदलून गेल्याचे सांगितले. दहीहंडीतील अपघातामुळे रुग्णालयातील उपचाराचा खर्च उचलणे देखील अवघड झाल्याचे सांगितले. सुरुवातीला त्याला अनेकांनी मदत केली. मित्र मंडळी धावून आले. परंतु काही वेळानंतर मिळणारी मदत कमी झाल्याचेही अधोरेखित केले. गेल्या काही दिवसांपासून नागेश हा उपचाराच्या खर्चाची मागणी सरकारकडे करत होता. त्यानंतर त्याच्या मदतीला मंत्री प्रताप सरनाईक धावून आले. गोविंदा नागेश भोईर याच्या उपचाराचा सर्व खर्च करणार असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
संस्कृतीची दहीहंडी उत्सव सुरू असताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली. यावेळी त्यांनी कुटुंबाला पाच लाख रुपयांची देखील मदत करणार असल्याचे जाहीर केले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Dahi Handi 2026 : सबसे कातिल गौतमी पाटील….दहीहंडीत काही मिनिटांच्या डान्ससाठी किती लाख घेते? आकडा थक्क करणारा
  • 12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट…
  • 6, 6, 6, 6, 6… आणि 100! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्मृती मंधानाच्या रडारवर दोन विश्वविक्रम
  • Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
  • टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in