
नृत्यांगणा गौतमी पाटील हिला आज ओळखीची गरज नाही, अनेक कार्यक्रम करत गौतमी हिने अनेकांच्या मनावर राज्य केलं. गौतमी तिच्या ग्रूपसोबत अनेक ठिकाणा सादरीकरण करत असते. यातूनच ती मोठी कमाई देखील करते.
फक्त सणच नाही तर, अनेक कार्यक्रमांसाठी गौतमी पाटील हिची मागणी मोठ्या प्रमाणात असते. गौतमी हिला पाहण्यासाठी चाहत्यांची संख्या देखील फार मोठी असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
तर समोर येत असलेल्या माहितीनुसार, गौतमी पाटील एका डान्स शोसाठी अंदाजे 80 हजार ते दीड लाखांपर्यंत मानधन घेते. तर दहीहंडीच्या कार्यक्रमांसाठी ती तिचं मानधन वाढवते, असं देखील म्हटलं जातं.
सांगायचं झालं तर, कार्यक्रमादरम्यान गौतमी पाटील लोकप्रिय मराठी गाण्यांवर आणि लावण्यांवर ठेका धरत रंगतदार नृत्य सादर करत असते. तिच्या प्रत्येक सादरीकरणाला प्रेक्षकांकडून टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात दाद मिळत असते.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाला पुरुषांसोबतच महिलांनीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शविली. सोशल मीडियावर देखील गौतमीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या मोठी असते.




Leave a Reply